🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात येणाऱ्या सेलू तालुक्यात सण उत्सवादरम्यान गावात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी सेलू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील 33 जणांवर गाव प्रवेश बंदी करण्यात आली आहे. हा आदेश उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दडाधिकारी वर्धा यांनी फौजदारी संहिता प्रक्रिया १९७३ चे कलम १४४ (२) नुसार निर्गमित केला आहे.
यावेळी गाव प्रवेश बंदी असलेल्यात धनराज पचारे सेलू, बॉबी खोडे सेलू, शिवा देवरे सेलू, अजय निनावे सेलू, हिरालाल राठोड, घोराड, गोविंदा जाधव घोराड, कैलास मांढरे सेलू, सतीश मते सेलू, स्वप्नील करलूके सेलू, संदीप साखरकर सेलू, संजय सहारे सुकळी, किशोर किरडे तळोदी, प्रवीण दाभडे तळोदी,कैलास मोहिजे टाकळी किटे, वैभव डायगव्हाने, वाहीतपूर, मोनीष गायकवाड केळझर, उमेश सातघरे जुनगड, आकाश खडसे शिवनगाव, दिपक शंभरकर हिंगणी, पुरुषत्तम नाईक हिंगणी, निखिल गुरनुले धामणगाव, सुनिल मेहुणे वडगाव, स्वप्नील भांडेकर अंतरगाव, अक्षय गोमासे आकोली, सुरज धाबर्डे रेहकी, राजू आत्राम टाकळी, गणेश मखरे सुरगाव, दिनेश भगत वडगाव, आशिष गोडघाटे रेहकी यांचा समावेश असून त्यांना दि. १३ ते १५ सप्टेंबर पर्यंत गाव प्रवेश बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

