अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शहराच्या विविध भागांत नागरिकांच्या घरातील तसेच विविध व्यावसायिकांच्या दुकानातील कचरा गोळा करण्यासाठी शहर महानगरपालिकेने कचरा गाडीची व्यवस्था केली असून, सकाळच्या वेळी ही गाडी शहराच्या विविध भागात फिरून सुखा व ओला कचरागोळा करते. परंतु, यासाठी मात्र नागरिकांना दरमहा ३० रुपये मोजावे लागतात. अकोला शहराव्यतिरिक्त इतर कुठल्याही शहरामध्ये कचरा गोळा करण्यासाठी नागरिकांना असे शुल्क आकारून केल्या जात नसल्यामुळे अकोल्यातच का? असा नागरिकांचा सवाल आहे.
कचरा गाडीच्या नावावर नागरिकांची लूट करून सुरू असलेल्या या प्रकारामुळे कचऱ्यातून देखील माया गोळा करण्याचा हा गोरखधंदा तर अकोला महानगर पालिकामध्ये काहींनी सुरू केला नसेल ना? अशी दाट शंका येते.
अकोला शहरात ज्या भागात कचरा गाडीचे शुल्क दिले जातात त्या भागातच ही कचरा गाडि सुरू असून ज्या भागात शुल्क नाकरले जाते त्या भागातुन हे कचरा गाडी कायमची बंद करण्यात आली आहे. स्वच्छ अकोला सुंदर अकोला या बिद्र वाक्याचा करत असून शहरात बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढिग लागलेले आहेत. म्हणून हे शुल्क बंद करून शहरातील प्रत्येक वार्डात ही कचरा गाडी सुरू करण्यात यावी ही नम्र विनंती अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी व अजित कुंभार जिल्हाधिकारी अकोला यांना ऑनलाईन पाठवलेल्या तक्रारीत केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

