उमेश इंगळे, अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- दिवाणी न्यायालय बाळापूर शेळद येथे बार असोसिएशन ची निवडणूक पार पडली. यामध्ये बाळापूर शेळद बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी ॲड. पंजाबराव श्रीपत तिडके यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडी बद्दल बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अकोला शाखेच्या वतीने डॉ. अरुण चक्रनारायण जिल्हाअध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष देविलाल तायडे, सुनिल सिरसाट महानगर अध्यक्ष, बाळासाहेब अंभोरे उपाध्यक्ष, डॉ. राजू मोरे,विजय कांबळे प्रशिक्षक डॉ. राजू मोरे संघटक सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी ॲड पंजाबराव तिडके यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बाळापूर शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

