सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सोलापूर:- सोलापूर जिल्हातून मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एकतर्फी प्रेमातून एक तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. तू माझी झाली नाही तर, मी तुला कुणाचीही होऊ देणार नाही, असे म्हणत एक युवकाने एकतर्फी प्रेमातून या तरुणीची हत्या केली आहे. ही घटना सांगोला पोलीस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी रात्री घडली आहे. ऋतुजा दादासो मदने असे मृतक तरुणीचे नाव असून सचिन मारुती गडदे आरोपीचे नाव आहे.
आरोपी सचिन मारुती गडदे रा. गौडवाडी, ता सांगोला याने ऋतुजा दादासो मदने वय 18 वर्ष, राईराची वाडी, ता सांगोला या तरुणीवर धारदार शस्त्राने डोक्यात, गळ्यावर, पाठीवर, हातावर मानेवर सपासप घाव करून ऋतुजा हीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे.
आरोपी सचिन हा ऋतुजावर प्रेम करत होता. तो ऋतुजाच्या मागे लग्न कर म्हणत होता पण घरच्यांनी तिचा विवाह समाधान कोळेकर सोबत केला होता. मात्र लग्नानंतर दोनच वर्षांनी ऋतुजा आणि समाधान यांच्यात वाद होत दोघांमध्ये घटस्फोट झाला होता. या घटस्फोटाला संचिन गडदे कारणीभूत होता. त्यानंतर पुन्हा ऋतुजाचा व सचिन गडदे यांचा संपर्क झाला होता. तेव्हाही तो माझ्याबरोबर लग्न कर असा दबाव टाकत होता. ऋतुजाने सचिन सोबत संपर्क कमी करत समाधान कारंडे रा. कारंडेवाडी ता सांगोला जि सोलापूर याच्या बरोबर तिचे प्रेम संबंध निर्माण केले होते. ऋतुजा आणि समाधान दोघे पळून जाऊन लग्न करणार होते. ही गोष्ट सचिनला समजताच तो ऋतुजावर भडकला.
ऋतुजा सचिन गडदेशी लग्न करण्यास तयार नसल्याने तो तिच्यावर चिडून होता. त्यामुळे संशयित आरोपी सचिनने डाव साधला. ऋतुजा शनिवारी सायंकाळी घरात एकटीच होती. ऋतुजाची आई दूध डेअरीवर कामावर गेली होती. वडील मूकबधीर आहेत याचा फायदा घेऊन संशयित आरोपी सचिनने घातक हत्यारांनी गळ्यावर हातावर वार करून तिची हत्या केली. पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी याचा पुढील तपास करत आहेत.

