Wednesday, January 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चैन स्नॅचरसह चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सोनारास सातपूर पोलिसांनी ठोकल्या बेळ्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 3, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चैन स्नॅचरसह चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सोनारास सातपूर पोलिसांनी ठोकल्या बेळ्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter


✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक /सातपूर :- नाशिक जिल्हात मोठ्या प्रमाणात चोरी आणि फसवणुकीच्या घटना वाढ होत आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी हे रोखण्यासाठी सक्रिय दिसून येत आहे. त्यात सातपूर परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबडणाऱ्या 28 वर्षीय चैन स्नॅचरसह चोरीचे सोने विकत घेणाऱ्या 33 वर्षीय सोनारास सातपूर पोलिसांनी अटक केली आहे. या बाबत सातपूर पोलिसांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

चंद्रकांत केदारे वय 28 वर्ष असे चेन स्नॅचरचे नाव असून कृष्णा दिलीप टाक वय 33 वर्ष असे चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सोनाराचे नाव आहे. सातपूरच्या श्रमिकनगर परिसरात राहणाऱ्या चंद्रकांत कौतिक केदारे याने भर दिवसा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडण्याचा धडाका लावला होता. श्रमिकनगर परिसरात लागोपाठ तीन दिवस महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडण्याच्या घटनांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. 30 ऑगस्ट रोजी राधाकृष्णनगर चौकातून मुलांना शाळेत सोडण्यासाठी पायी जाणाऱ्या प्राची पुरुषोत्तम बाबर या महिलेच्या गळ्यातील 33 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्याने ओरबाडली होती.

सातपूर परिसरात चंद्रकांत केदारे याने तीन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोने ओरबडले असून पोलीसांनी सापळा रचून त्याला मुद्देमाल तसेच चोरीत वापरलेली मोटर सायकल जप्त करुन अटक केली. त्याच्याकडून अजूनही सात ते आठ गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांनी तीन वेगवेगळी पथके तयार करून परिसरातील सीसीटीव्हीचे बारकाईने निरीक्षण केले. सोनसाखळी चोराने परिधान केलेले कपडे व त्याच्याकडे लाल काळ्या रंगाचे हेल्मेट, तसेच होंडा शाईन मोटरसायकल व टाकीला लाल पट्टे असल्याचे निष्पन्न झाले होते. डी. बी. पथकाच्या तीन टीम श्रमिकनगर, कार्बन नाका व राधाकृष्णनगर भागात संशयिताचा शोध घेण्यासाठी कार्यरत होत्या. याचवेळी श्रमिक नगर मधील हिंदी शाळेच्या परिसरात वरील वर्णनाचा संशयित डी.बी. पथकातील कर्मचारी विनायक आव्हाड व सागर गुंजाळ यांना दिसला. त्याला थांबवण्याचा प्रयत्न करताच तो जोरात पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली देतानाच श्रमिकनगर मधील निर्मित लाईफ फेज येथे राहणाऱ्या कृष्णा दिलीप टाक या सोनारासह सोने विक्री केल्याची कबुली दिली आहे.

Previous Post

शिर्डीत लवकरच अतिक्रमण हटाव मोहिम राबविली जाणार.

Next Post

अहमदनगर शहरात विक्रीसाठी आणण्यात आलेले चार गावठी कट्टे व 16 जिवंत काडतुस सह एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अहमदनगर शहरात विक्रीसाठी आणण्यात आलेले चार गावठी कट्टे व 16 जिवंत काडतुस सह एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

अहमदनगर शहरात विक्रीसाठी आणण्यात आलेले चार गावठी कट्टे व 16 जिवंत काडतुस सह एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In