गुन्हे शाखेकडून पुणे शहरात विशेष मोहिम राबवुन कोटपा अॅक्ट प्रमाणे कारवाई.
दशरथ गायकवाड, पुणे प्रतिनिधी
पुणे:- शहरात मोठ्या प्रमाणात बंदी असलेले तंबाखुजन्य पदार्थ विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक तरुण याला बळी पडत आहे. तरुणाचे आयुष्य बर्बाद होत आहे.
पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी पुणे शहरातील शाळा, महाविद्यालयाचे परिसरात बेकायदेशिररित्या विक्री होणारे वैधानिक ईशारा नसलेले तंबाखुजन्य पदार्थ, तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर बंदी असलेले तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणा-यां दुकानदार यांचेवर सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम २००३ व नियम २००४ चे कलम प्रमाणे विशेष मोहिम राबवुन कडक कारवाई करण्याचे आदेश अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ व पथक २ यांना देवुन मार्गदर्शनपर सूचना दिलेल्या होत्या.
त्यानुसार दिनांक 15 ऑगस्ट ते दिनांक 30 ऑगस्ट या पंधरवडयाचे कालावधीत अंमली पदार्थ विरोधी पथक 1 चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड व अंमली पदार्थ विरोधी पथक 2 चे प्रभारी अधिकारी श्री प्रकाश खांडेकर यांनी त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी व स्टाफचे मदतीने पुणे शहरातील समर्थ, बंडगार्डन, सिंहगड रोड, वारजे माळवाडी, कोरेगांव पार्क, भारती विदयापीठ, येरवडा, वानवडी, चतुःश्रृंगी पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रात शाळा कॉलेजस चे 100 यार्ड परिसरात वैधानिक ईशारा नसलेल्या तंबाखुजन्य पदार्थ व सिगारेट याची विक्री करणारे 30 पान टपरी चालकांवर तसेच वैधानिक ईशारा नसलेले विदेशी सिगारेट, तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणारे 19 दुकानदार यांचेवर कोटपा अॅक्ट नुसार १९ खटले दाखल करुन त्यामध्ये ८,४७,६१९/- रु कि चे वैधानिक ईशारा नसलेले विदेशी सिगारेट,तंबाखुजन्य पदार्थ जप्त करुन कारवाई करुन एकुण ४९ खटले सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम २००३ व नियम २००४ चे कलम ६ (ब), २४ व ७ (२) २० (२) (कोटपा अॅक्ट) प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.