उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कारवाईची उलगुलान संघटनेची मागणी.
सौ. हनिशा दुधे, तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
बल्लारपूर:- भाजपाचा शहर सचिव तथा संगणक प्रशिक्षण केंद्राचा मालक संजय वाजपेयी यांनी आपल्याच प्रशिक्षण केंद्रातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. याबाबत बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये त्याचे विरोधात गुन्हा दाखल झाला परंतु भाजपाचे काही राजकीय पुढारी अशा नराधमाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच आरोपींनी आजपर्यंत अनेक मुलींचा विनयभंग केला अशी तक्रार संघटनेकडे आलेली असून याची उच्चस्तरीय चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली.
मागील दहा वर्षापासून भाजपाच्या संजय वाजपेयीनी कित्येक मुलींची आपल्या संगणक प्रशिक्षणाच्या माध्यमातून अश्लील छेडखानी केली. एका अल्पवयीन मुलींवर त्यांनी वारंवार विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्या मुलीनी सदर नराधमाची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. तक्रार करतात याच्यावर गुन्हा दाखल झाला. विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच भाजपाच्या अंतर्गत गोटात खळबळ माजली व बदनामीपोटी त्यांनी संजय वाजपेयीला राजकीय दबावातून वाचवण्याचा प्रयत्न केला व करत आहेत. ही बाब अशोभनीय असून भाजपाचे बडे नेते बलात्काऱ्यांना मदत करतात का? असा प्रश्न राजू झोडे यांनी उपस्थित केला. त्याच्याच वॉर्डातील एका नगरसेवकांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अतिशय गंभीर असून आजपर्यंत अनेक मुलींवर या नराधमांनी अत्याचार केले आहेत याची उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच तात्काळ सदर प्रशिक्षण केंद्र बंद करावे या मागणीला घेऊन उलगुलान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिले. निवेदन देताना राजू झोडे, प्रदीप झांमरे, अनिरुप पाटील, गौतम रामटेके, सुमित साखरकर, मारोती नेवलकर, जयवंत जीवने, सोहेल खान तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

