संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन नागपूर:- आगामी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा ने तयारी सुरू केली आहे. भाजपाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे भाजपा पदाधिकारी च्या बैठकीत कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला असल्यानं ते परत एकदा चर्चेत आले आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये. यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, चाय प्यायला म्हणजे समजले असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना धाब्यावर जेवण करायला घेऊन जा, असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे भाजपा पदाधिकारी च्या बैठकीत दिला.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित रविवार (दि. २४) शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात महा विजय २०२४ विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बुथ रचना पदाधिकाऱ्यांना संभाळण्याचे जबाबदाऱ्या या विषयावर बावनकुळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले, ज्या बुथ वर काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिकल मीडिया कोण आहेत पोर्टल मीडिया वाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतोय, पण हे हे असं काही टाकतात की, जणू गावात बॉम्ब फुटला यासाठी बूथ वर जे चार-पाच पत्रकार यांची यादी तयार करा एक, दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्ट्रिकल मीडिया वाले असतील, यांना तुम्ही चहा प्यायला बोलावा चहा प्यायला बोलावलं म्हणजे समजले असेल तुम्हाला त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेत. महाविजय २०२४ पर्यंत बूथ संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाहीत. याची काळजी घ्या व सर्वा सकारात्मक बातम्या आल्या पाहिजे यांच्या काळजी घ्या असे बावणकुळे यावेळी म्हणाले

