Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

मुंबई: या निर्णयामुळे संपूर्ण मुस्लिम बांधवांनी मुंबईकरांची मनं जिंकली! पोलिसांनी मानले आभार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 25, 2023
in धर्म, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबई: या निर्णयामुळे संपूर्ण मुस्लिम बांधवांनी मुंबईकरांची मनं जिंकली! पोलिसांनी मानले आभार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:– भारत देश विविध जात धर्म आणि पंथाने नटलेला देश आहे. देशात सर्व धर्माचे सण उत्सव अगदी सर्वधर्म समभावाने उत्साहात साजरे केले जाते.

पण वर्षी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण एकाच दिवशी म्हणजे 28 सप्टेंबरला आले आहेत. यामुळे पोलीस प्रशासनावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बराच ताण येण्याची शक्यता निर्माण झाली होती. हाच ताण कमी करण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून ईद- ए- मिलाद च्या दिवशी काढण्यात येणारा जुलूस किंवा मिरवणूक ही सप्टेंबर 29 म्हणजे एक दिवस नंतर काढण्यात येणार आहे.

मुंबईतील गणेशोत्सव हा जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई शहर गर्दीने अगदी गजबजून जाते. पण या वर्षी ईद-ए-मिलाद देखील त्याच दिवशी आली आहे. त्यामुळे त्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनावर बराच ताण आला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी भायखळा येथील खिलाफत हाऊस येथे अनेक मुस्लिम प्रतिनिधींच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

मुस्लिम धर्मातील ज्येष्ठ मौलवी मौलाना मोईन अश्रफ कादरी (मोईन मियाँ) यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. ईद-ए-मिलाद 28 सप्टेंबरला असली तरीही शांतता आणि सुव्यवस्थेच्या हितासाठी जुलूस किंवा मिरवणूक हि एक दिवस पुढे ढकलल्यास कोणतीही अडचण येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.या बैठकीला माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आरिफ नसीम खान, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नसीम सिद्दीकी उपस्थित होते.

बैठकीत काय झाला निर्णय?
गणेशोत्सव हा सण मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मुंबई नगरी गजबजून गेलेली असते. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतं. त्याचबरोबर ईद-ए-मिलाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात मुस्लिम भाविक सुद्धा रस्त्यावर उतरून मिरवणुका काढतात. त्यामुळे यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याच चित्र असतं. हाच मुद्दा या बैठकीमध्ये मांडण्यात आला. पण यावर उपाय म्हणून काहीतरी मार्ग काढणं हे जास्त गरजेचं होतं. त्यामुळे ईदचा जुलूस हा अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी काढण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी समंती दिली. त्यामुळे पोलिसांना विश्वासात घेऊन ईदची मिरवणूक एक दिवस पुढे ढकललण्यात आली.

मुबंई पोलिसांनी मानले जाहीर आभार..
मुस्लिम बांधवांकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचं पोलिसांनी देखील कौतुक केलं आहे. मुंबई पोलिसांना या दोन्ही दिवशी पोलीस बंदोबस्त तैनात करायचा आहे.शिवाय शहराच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या मुंबई पोलिसांवरचा ताणही यामुळे थोडा कमी झालाय. तर मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचं देखील कौतुक केलं जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445318

Previous Post

दारू पिऊन दुचाकी चालकाने महिला पोलिसांच्या दुचाकीला धडक; 8 महिन्यांच्या गर्भवती पोलिसाचा मृत्यू.

Next Post

गडचिरोली जिल्हातील झिंगानूर गावाला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा : 30 गावातील गावकऱ्यांची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गडचिरोली जिल्हातील झिंगानूर गावाला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा : 30 गावातील गावकऱ्यांची मागणी.

गडचिरोली जिल्हातील झिंगानूर गावाला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा : 30 गावातील गावकऱ्यांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In