संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थिनीवर कुऱ्हाडीचा धाक दाखवून गुराख्याने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही विद्यार्थीनी घराकडे जात असताना जामठ्या जवळील जंगलात या नराधम गुराख्याने तिच्यावर बलात्कार केला.
बुधवारला दुपारच्या सुमारास पिढीत विद्यार्थीनी घराकडे जात होती यावेळी जामठ्याजवळील जंगलात या नराधम गुराख्याने कुऱ्हाडीचा धाक दाखवून या विद्यार्थिनीला अडविले. त्यानंतर त्याने या विद्यार्थिनीला जंगलात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. यावेळी हिंगणा पोलिसांनी या विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून नराधम आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध केला आहे.
यवतमाळ येथे राहणारी पिढीत विद्यार्थीनी ही नागपुर मधील हिंगणा येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची शिक्षण घेत आहे. बुधवारी ती यवतमाळ येथून बसने नागपुर येथे आली. अभियांत्रिकी महाविद्यालय काही अंतरावर असल्यामुळे ती पायी जात होती. तो भाग जंगलाचा आहे. काही वेळातच एक गुराखी कुऱ्हाड घेऊन पाठलाग करायला लागला. त्याने या विद्यार्थिनीला रस्त्यात गाठले आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवून तिला जंगलात नेले. तिच्यावर बलात्कार केला.
या प्रकरणी हिंगणा पोलिस स्टेशन येथे या तरुणीचा तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. गुराखी हा नराधम व्यक्ति पाठलाग करीत असल्यामुळे घाबरलेल्या तरुणीने बहिणीला फोन केला. बहिणीशी बोलतानाच त्याने तिचा भ्रमणध्वनी हिसकला आणि फोडला. त्यानंतर बहिणीने हिंगणा पोलिसांना माहिती दिली. तासाभराने हिंगणा पोलीस घटनास्थळावर पोहचले. तेथे भेदरलेल्या अवस्थेत ही तरुणी मिळून आली.

