तुषार थुटे व राजू सराटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा विदर्भाच्या दौऱ्यावर आल्याअसता संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांचा वर्धा येथे पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्याला प्रभावित होऊन हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार राजू तिमांडे जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, सुधीर कोठारी, पूर्व विदर्भ अध्यक्षा डॉ. सुरेखा देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष संदीप किटे, महिला जिल्हाध्यक्ष ज्योतिताई देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी तुषार थुटे व राजू सराटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, अभिषेक पोटफोडे, श्रावण महाजन, गजानन चाफले, मोहन राऊत, शुभम दुधनकर, हेमंत पोटफोडे, सलीम शेख, प्रणित बोरकर, प्रतीक गेडाम, योगेश आडकिने, अंकुश लांडे, सचिन मानकर, विनोद झाडे, गणेश तुळनकर, आकाश मडावी, स्वप्निल तुळनकर,शक्ती गेडाम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 7385445348

