संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाइन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका दुकानदाराने त्याचा जवळ आलेल्या ग्राहकाचा चॉपरने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
नागपूर शहरातील एका मटणाच्या दुकानात दोन लोकांमध्ये वाद विकोपाला पोहोचला या दरम्यान संताप झालेल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर मास कापण्याच्या चोपरणे हल्ला केला त्या एका 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.महेंद्र राम कोहले राह. साईनगर असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ८ ऑक्टोंबर रोजी साईनगर येथील रहिवाशी महेंद्र राम कोहले दुपारी मटन घेण्यासाठी मटणाच्या दुकानात गेले होते. जिथे त्यांना एक ओळखीचा माणूस भेटला. त्यांनी सांगितले की यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. दुकानात उपस्थित असलेल्या आशिक शेख बब्बू शेख रहमान वय 22 वर्ष याने कोहले आणि ओळखीच्या व्यक्तीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण हा वाद विकोपाला गेल्याने ही हत्या करण्यात आली.
याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस कर्मचारी घटनस्थळी दाखल झाली आरोपी रहमान ला भारतीय दंड संहिता आयपीसी 302 हत्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले.

