अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- नजीकच्या धनोडी (नांदपूर) येथे जाऊन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वी येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकांनी बाकळी नदिच्या काठावर जाऊन गणपती विसर्जनामुळे तयार झालेले निर्माण व कचरा साफ करून त्याची विल्हेवाट लावली व स्वच्छतेचा संदेश दिला.
आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी ओळखल्या जाणाऱ्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आर्वी येथे दिनांक १ ऑक्टोबरला रासेयो स्वंयसेवकांनी महात्मा गांधींच्या सेवाग्राम येथील आश्रमामध्ये जाऊन साफसफाई व स्वच्छता करण्यात आली. २ ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयातील परिसर रासेयो स्वयंसेवकांनी स्वच्छ केला. त्याचाच एक भाग म्हणून नजीकच्या धनोडी (नांदपूर) या ठिकाणी शहरातील गणपती विसर्जनाच्या वेळी मोठी गर्दी असते. सर्वात जास्त गणपती आर्वी शहरातील या ठिकाणी विसर्जित करण्यात येते. त्यामुळे बाकळी नदीच्या दोन्ही बाजूच्या किनाऱ्यावर गणपतीच्या निर्माल्यासह केरकचरा पडलेला असतो. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी तिथे प्रत्यक्ष जाऊन तो केरकचरा उचलला व निर्मल्याची योग्य विल्हेवाट लावली.
यावेळी रासीयो स्वयंसेवकांनी नदीच्या पाण्यातील देखील निर्माल्य काढून त्याची योग्य विल्हेवाट लावली. धनोडी(नांदपूर) या गावातील सरपंच सौ कोमलताई सागरराव कोल्हे आवर्जून उपस्थित होत्या. सोबत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.आशिष पेठे ,डॉ.प्रवीण काळे व प्रा.दर्शनकुमार चांभारे व रासयो स्वयंसेवक यांनी या स्वच्छता मोहिमेत सक्रियतेने सहभाग नोंदविला.
स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगेबाबा यांचे विचार पुस्तकातून शिकण्या सोबतच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या अंगी उतरवण्यासाठी अशाप्रकारे स्वच्छता मोहीम आखून त्याद्वारे त्यांना समाजकार्यासाठी प्रेरित करणे हा उद्देश अशा कार्यक्रमांचा असतो.अशी प्रतिक्रिया यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.आशिष पेठे यांनी व्यक्त केली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 7385445348

