मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन हिंगणघाट:- तिने पाच पिलांना जन्म दिला आणि पिलांना सोडून ती देवाघरी गेली. तिच्या पिल्लांचे अजून पुरते डोळेही उघडलेले नाहीत. नंदोरी चौक हिंगणघाट येथील पुला खाली कोणीतरी नुकत्याच जन्मलेल्या एका श्र्वानाचे पाच पिल्ले सोडून दिले. आईची दिव्य मूर्तीही त्यांनी बघितली नाही. एक दिवसाचं ते अनाथ पिल्लू, नाळ सुद्घा तुटली नव्हती. मायेसाठी आसुलेल होत. कोणीतरी जीवरक्षक फाउंडेशनला त्या एक दिवस वय असलेल्या मुक्या जीवाची माहिती दिली.
माहिती मिळताच ममतेची मूर्ती असलेल्या राकेश झाडे नामक त्या मातृहृदयी तरुणाने चक्क त्या नवजात बाळाला दत्तक घेतले. आपल्या हाताने त्या पिलाला दूध पाजून त्याच्यात श्वास भरण्याचा ध्यास घेत तो त्याला आईच्या ममतेची मूर्ती होऊन जगवित आहे. त्या निरागस जीवाची ममता तर त्याला नेहमीसाठी सोडून अनंतात विलीन झाली. परत कधीही परतून न येण्यासाठी. परंतु येथील वन्यजीवरक्षक राकेशने नियतीचे हे आव्हान स्वीकारले. तिच्या ममत्वाची पूर्तता करण्याचा त्याने चंग बांधलेला आहे. त्या एकदिवसाचे वय असलेल्या त्या निरागस बाळाचे डोळे उघडेल तेंव्हा त्याच्या चक्षु समोर ती जन्मजाती दिसणार नाही दिसेल ती त्याला बॉटलने दूध पाजून त्याच्यात चैतन्य निर्माण करणाऱ्या राकेश झाडे नावाची दिव्य मूर्ती.
पशु – पक्ष्यांशी दिव्यत्वाचे नाते जोडणाऱ्या राकेश झाडे या आधुनिक ऋषिला प्रणाम ! आदिमायेच्या नवरात्रीच्या काळात राकेशच्या रुपात प्रगटली भवानी ! तिच्या विविध रूपाला साष्टांग दंडवत !

