Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

आता गडचिरोलीत आदिवासी संघटनांनी आरक्षणासाठी पुकारला एल्गार, काढला भव्य मोर्चा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 22, 2023
in आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
आता गडचिरोलीत आदिवासी संघटनांनी आरक्षणासाठी पुकारला एल्गार, काढला भव्य मोर्चा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- राज्यात आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे. त्यात आता आदिवासी समाजाने जोरदार आंदोलन सुरू केले आहे. खरे आदिवासींच्या आरक्षण सूचीमध्ये गैरआदिवासी धनगर समाजाचा समावेश करू नये या मागणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील 25 च्या वर आदिवासी संघटनांच्या नेतृत्वात हजारो आदिवासीनी शुक्रवार 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या मोर्चात दिलेल्या विविध घोषणांनी शहरासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला.

गडचिरोली शहराच्या धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयातून आदिवासींच्या मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चात जिल्हाभरातील विविध भागातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘आरक्षण आमच्या हक्काचा…, आदिवासी बचाओ, संविधान बचाओ, जय सेवा, भारत माता की जय’ यासह विविध घोषणा मोर्चेकरूंनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर मोर्चेकरूंसाठी बसण्याची व्यवस्था केली होती. जिल्हाधिकारी कार्यालय, जि.प., जिल्हा व सत्र न्यायालय परिसरातील विविध रस्ते पोलिसांनी बंद केले होते. रहदारीसाठी केवळ नवेगाव टी-पॉइंट ते सोनापूर रस्ता सुरू ठेवला होता. आंदोलनात आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, तसेच काँग्रेसचे नामदेव किरसान, विश्वजीत कोवासे, विकास कोडापे, नंदू नरोटे, डॉ. नितिन कोडवते, छगन शेडमाके, माधव गावळ, भरत येरमे, कुणाल कोवे, सैनू गोटा, सदानंद ताराम, दौलत धुर्वे, गंगाधर मडावी आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य व आदिवासीबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यावेळी आपल्या विविध मागण्यासाठी:
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध घोषणा देऊन संयोजक समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष घनश्याम मडावी यांच्या नेतृत्वात आपल्या विविध 26 मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी समितीचे सचिव भरत येरमे, कार्याध्यक्ष माधवराव गावळ, उपाध्यक्ष प्रशांत मडावी, सहसचिव गुलाबराव मडावी, कोषाध्यक्ष नामदेव उसेंडी, चंद्रकुमार उसेंडी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

नागपुरात मोबाईल न दिलामुळे नराधम मुलाने जन्मदात्या आईची केली गळा आवळून हत्या.

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस वाशिम महिला जिल्हा अध्यक्षपदी सीमा सूरूशे यांची नियुक्ती, रुपाली चाकणकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस वाशिम महिला जिल्हा अध्यक्षपदी सीमा सूरूशे यांची नियुक्ती, रुपाली चाकणकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र.

राष्ट्रवादी काँग्रेस वाशिम महिला जिल्हा अध्यक्षपदी सीमा सूरूशे यांची नियुक्ती, रुपाली चाकणकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In