वाशिम जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशीम:- राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार पक्ष बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सामील होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आणि सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या सीमा सुरूशे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाशिम जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना जिल्हाध्यक्ष पदाचे प्रमाणपत्र महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी वाशिम येथे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत प्रधान केले.
यावेळी वाशिम जिल्ह्यातील मोठ्या संख्येने महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश संपन्न झाला. यावेळी राज्य महिला आयोग सदस्या श्रीमती. आभा पांडे, श्रीमती.सोनालीताई ठाकूर, दत्तराज डहाके, अरुणभाऊ ताथाडे, सुनील पाटील लपाटे, सर्व फादर बॉडीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलून गेले आहे. राष्ट्रवादीच्या बहुतांशी आमदार, खासदार आणि राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजितदादा पवार यांच्या गटाला अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते अजितदादा पवार यांच्या बरोबर उभे आहे. वाशीम जिल्ह्यात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व असलेल्या सीमाताई सुरूशे यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनालीताई ठाकूर आणि हाजी मोहम्मद युसुफ पुंजीनी यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्हात अनेक क्रियाशील कार्यकर्ते तन मन धनाने कार्यरत आहे. ते दिवस रात्र नागरिकांच्या अनेक समस्यांवर त्यांनी आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. शिवाय प्रशासनावर त्यांची चांगली पक्कड आहे. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन सीमाताई सुरूशे राजकारण, समाजकारण करून सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तीमत्व असल्यामुळे त्यांच्यावर ही महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.
या निवडीनंतर बोलताना सीमा सुरूशे म्हणाल्या की, मला समाजकारण करून सर्व समावेशक जनतेच्या समस्या प्रश्न जाणून घेऊन त्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम मी करणार आहे. माझ्या साठी समाजाचा सर्वांगीण विकास महत्वाचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते अजितदादा पवार व रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वात आज शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मला ही जबाबदारी दिली त्याचे मी आभार मानते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा अध्यक्ष म्हणुन काम करताना सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

