नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नंदुरबार दि.21:- नवरात्री उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे महिला शक्तीचा जागर घरोघरी सुरू आहे. त्यामुळे आज नवरात्रीचा सातवा दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने नवदुर्गा सन्मान देऊन शहादा येथील बस डेपोत काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच महिला आयोगाच्या अध्यक्ष सौ. रूपालीताई चाकणकर, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे याच्या मार्गदर्शनात नंदुरबार जिल्ह्यात शहादा शहरात प्रथमच महिला बस चालक (ड्रायव्हर) म्हणून आलेल्या पल्लवी बेलदार व महिला कंडक्टर आणि महिला लिपिक यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष सौ.सीमा हेमंत सोनगरे यांनी केला. त्यावेळी त्यांच्यासोबत शहादा शरद अध्यक्ष सौ नजमा मोहम्मद मेहमान देखील उपस्थित होत्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी बस आवारात महिलांचा सत्कार करण्यासाठी गेले असता सर्व महिला अगदी आनंदीत झाल्या त्यांना इतका आनंद झाला की प्रथमताच कोणीतरी आमची दखल घेतली आणि आमच्याशी हितगुज साधण्यासाठी, आमच्या अडचणी जाणून घेण्यासाठी व आमचा सत्कार करण्यासाठी आलात त्याबद्दल आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळाली असं सगळ्या महिला सांगत होत्या. यावेळी रूपालीताई यांना मनापासून धन्यवाद दिले. आणि म्हणाल्या की, नवदुर्गा सन्मान या संकल्पनेमुळे आम्हाला सर्व स्तरातील महिलांशी संपर्क करता आला आणि त्यांच्या चेहऱ्यावरील एक वेगळच आनंद बघून आम्ही पण आनंदित झालो आहोत.
नवदुर्गा महिलांचा सन्मान करण्यात आला त्यांची नावे खालील प्रमाणे कुमारी जागृती जगन राठोड, श्रीमती राजश्री सुदाम तडवी, श्रीमती सुवर्णा मुकेश पाटील, सौ. राजश्री मंगेश बोरसे, सौ. कविता रवींद्र सुरळकर, श्रीमती विद्या राजेंद्र ओगळे, सौ. रुपाली जितेंद्र नवाळे, सौ. रुपाली प्रवीण वाकळे, पल्लवी एकनाथ बेलदार इ.
आपल्या या नवदुर्गा सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी शहादा बस डेपोचे मॅनेजर हरीश भोई व त्यांचे सहकारी यांचे मनापासून राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने धन्यवाद मानण्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

