वाशीम जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम दि.21:- सर्वत्र नवरात्र उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे महिला शक्तीचा जागर घरोघरी सुरू आहे. त्यामुळे आज नवरात्रीचा सातवा दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला कमिटीच्या वतीने नवदुर्गा सन्मान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच. मालेगाव येथील होमगार्ड मध्ये काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
दिनांक 21 ऑक्टोंबर रोजी नवदुर्गा सन्मान दुर्गा सन्मान मालेगाव येथील होमगार्ड मध्ये काम करणाऱ्या महिलांचा सातवा दिवस माननीय आमदार माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब साहेब माननीय प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे साहेब माननीय प्रदेशाध्यक्ष तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रूपालीताई चाकणकर यांच्या संकल्पनेतून आणि वाशिम जिल्ह्याचे अध्यक्ष युसुफ पुंजाजी यांच्या मार्गदर्शनाखाली होमगार्ड अनिता सहस्त्रबुद्धे व त्यांच्या सहकारी यांचा वाशिम जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सीमा राजेश सुरोशे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रूपालीताई चाकणकर यांच्या संकल्पनेतून आणि वाशिम जिल्ह्याचे अध्यक्ष युसुफ पुंजाजी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनालीताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव येथील होमगार्ड अनिता सहस्त्रबुद्धे व त्यांच्या सहकारी यांचा वाशिम जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्ष सीमा राजेश सुरोशे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाशिम जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्ष सीमा राजेश सुरोशे यांनी होमगार्ड याचा सत्कार केला असता त्यावेळी उपस्थित सर्व महिला अगदी आनंदीत झाल्या त्यांना इतका आनंद झाला की प्रथमताच कोणीतरी आमची दखल घेतली आणि आमच्याशी हितगुज साधण्यासाठी, आमच्या अडचणी जाणून घेण्यासाठी व आमचा सत्कार करण्यासाठी आलात त्याबद्दल आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळाली असं सगळ्या महिला सांगत होत्या. यावेळी रूपालीताई यांना मनापासून धन्यवाद दिले. आणि म्हणाल्या की, नवदुर्गा सन्मान या संकल्पनेमुळे आम्हाला सर्व स्तरातील महिलांशी संपर्क करता आला आणि त्यांच्या चेहऱ्यावरील एक वेगळच आनंद बघून आम्ही पण आनंदित झालो आहोत. असे मत वाशिम जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्ष सीमा राजेश सुरोशे यांनी व्यक्त केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

