Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गडचिरोलीत सून व साळ्याच्या पत्नीने संगमत करून आपल्याच कुटुंबातील पाच जणांची विष प्रयोग करून केली निर्घृण हत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 22, 2023
in क्राईम, गडचिरोली, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
गडचिरोलीत सून व साळ्याच्या पत्नीने संगमत करून आपल्याच कुटुंबातील पाच जणांची विष प्रयोग करून केली निर्घृण हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- येथून संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. सून आणि साळ्याच्या पत्नीने संगमत करून आपल्याच कुटुंबातील पाच जणांची विष प्रयोग करून निर्घृण पने हत्या केली आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण जिल्हासह राज्यात खळबळ उडाली आहे.

गडचिरोली जिल्हातील अहेरी तालुक्यातील महागाव येथील शंकर पिरू कुंभारे यांच्या कुटुंबातील पाच जणांचा अवघ्या 20 दिवसांच्या अवधीत अचानक आजारी पडून संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणाचे गूढ अखेर उलगडले असून कुंभारे यांची सून संघमित्रा आणि त्यांच्या साळ्याची पत्नी रोझा रामटेके या दोघींनी सनगमत करून या पाचही जणाचा नियोजनबद्ध पद्धतीने हत्या केल्याची धक्कादायक बाब तपासात उघडकीस आली आहे.

कुंभारे कुटुंबातील पाच जणांच्या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. काहींनी हा प्रकार अंधश्रेद्धेशी जोडण्याचाही प्रयत्न केला. पण पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास यंत्रणा कामाला लावली आणि हे गूढ उलगडण्यात अखेर पोलिसांना यश आले.

प्राप्त माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे व त्यांची पत्नी विजया कुंभारे यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना अगोदर अहेरी, नंतर चंद्रपूर व शेवटी नागपूर येथे रुग्णालयात भरती करण्यात आले. 26 सप्टेंबरला शंकर कुंभारे व 27 सप्टेंबरला विजया यांचा मृत्यू झाला. त्या धक्क्यातून परिवार सावरत असतानाच अहेरी येथे राहणारी त्यांची मुलगी कोमल दहागावकर, मुलगा रोशन कुंभारे तसेच शंकर कुंभारे यांची मूल येथे राहणारी साळी वर्षा उराडे यांचीही प्रकृती बिघडली. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आले. 8 ऑक्टोबर रोजी कोमलचा, 14 ऑॅक्टोबरला वर्षाचा तर दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबरला रोशनचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या पाच झाली होती.

मृतक शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा सागर कुंभारे हा दिल्लीत राहतो. तो आला होता. तो दिल्लीला परतल्यावर अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला तेथे रुग्णालयात भरती करण्यात आले. शिवाय कुंभारे दाम्पत्याला अहेरी येथून चंद्रपूरला उपचारासाठी नेणारा कारचा चालक राकेश मडावी याचीदेखील प्रकृती बिघडली. त्याला चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. शंकर कुंभारे यांच्या साळीच्या मुलाचीही प्रकृती बिघडली व त्यालाही रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या या तीनही जणांची प्रकृती स्थिर आहे.

एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यासाठी पोलिसांनी चार वेगवेगळी तपास पथके गठित करून यंत्रणा सक्रिय केली. या यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीत संशयाची सुई संघमित्रा कुंभारे व रोझा रामटेके यांच्याकडे गेली. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर या प्रकरणातील धक्कादायक माहिती पुढे आली. या गुन्ह्यात इतरही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

यासाठी केली पाच जणांची हत्या.
आरोपी संघमित्रा ही मृतक रोशन कुंभारे याची पत्नी आहे. तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन डिसेंबर 2022 मध्ये लग्न केले होते. त्यामुळे संघमित्राच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. विवाहानंतर पती रोशन व सासरच्या मंडळींकडून तिचा जाच व्हायचा. म्हणूनच तिने त्यांचा काटा काढायचा ठरवले. दुसरी आरोपी रोझा रामटेके ही मृतक विजया कुंभारे वहिनी, म्हणजेच संघमित्राची मामेसासू आहे. विजया कुंभारे व तिच्या अन्य बहिणी वडिलांच्या (रोझाच्या सासऱ्यांच्या) शेतजमिनीत हिस्सा मागत होत्या. त्यावरून त्यांच्यात नेहमी वाद व्हायचा. त्यामुळे संघमित्रा व रोझा या दोघींनीही संगनमत केले व संपूर्ण कुंभारे परिवार व त्यांच्या नातलगांना विष देऊन हत्या करण्याची योजना आखली.

असा प्रकारे करण्यात आला विषप्रयोग…
आरोपी संघमित्रा व रोझा या दोघींनीही अगोदर कुंभारे कुटुंबाला संपविण्यासाठी धोतरा या विषारी वनस्पतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण, या वनस्पतीमुळे अन्न किंवा पाण्याचा रंग बदलत होता. त्यामुळे इंटरनेटवर शोधून त्यांनी रंग, चव, गंध मिसळल्यानंतरही न बदलणाऱ्या एका विशेष प्रकारच्या रासायनिक विषाची माहिती मिळवली. या विषाचा असर चार-पाच दिवसांनी संथ गतीने होतो. रोझाने तेलंगण राज्यातून हे विष आणले. संधी मिळेल तेव्हा या दोघींनी खाण्यापिण्यात हे विष मिसळले. कुंभारे दाम्पत्याला रुग्णालयात नेणाऱ्या वाहनचालक राकेश मडावी याला जडीबुटीचे पाणी असल्याचे सांगत एक बाटली संघमित्राने दिली होती. त्यातील पाणी प्यायल्याने राकेशचीही प्रकृती बिघडली.

Previous Post

मालेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सीमा सुरूशे यांच्या हस्ते होमगार्ड मध्ये काम करणाऱ्या महिलांचा नवदुर्गा सन्मान.

Next Post

कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन तसेच गंगाई बहुउद्देशीय सेवा संस्थेचा वतीने 25 गावांमध्ये बाल विवाह प्रतिबंध अभियानांतर्गत दिली शपथ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन तसेच गंगाई बहुउद्देशीय सेवा संस्थेचा वतीने 25 गावांमध्ये बाल विवाह प्रतिबंध अभियानांतर्गत दिली शपथ.

कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन तसेच गंगाई बहुउद्देशीय सेवा संस्थेचा वतीने 25 गावांमध्ये बाल विवाह प्रतिबंध अभियानांतर्गत दिली शपथ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In