प्रशांत जगताप संपादक 9766445348
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन तसेच गंगाई बहुउद्देशीय सेवा संस्था हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा जिल्ह्यातील 25 गावामध्ये विद्यार्थ्यांना बालविवाहमुक्त प्रतिबंध करण्यासाठी शपथ देण्यात आली.
बालविवाह म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे. एक समृद्ध समाजाचे निर्माण करण्यासाठी बाल विवाह रोखण्यास सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. बाल विवाह झालेल्या मुलींचा लैंगिक विकास पुरेसा झालेला नसतो. अशा स्थितीत १८ वर्ष गाठायच्या आतच त्यांना गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेले शरीर, घरातल्या कामाचे ओझे आणि त्यातच अपुरे पोषण.. या सा्ऱ्यांचे वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर झाल्याखेरीज राहात नाहीत.
लहान वयात लग्न झाल्यामुळे आपल्या लैंगिकते विषयी पुरेसे ज्ञान या मुलींना नसते कुटुंबनियोजन, गर्भधारणा आणि गर्भारपणात घ्यायची काळजी हे तर फारच दूरचे विषय असतात. त्यामुळे त्यांना कधीकधी आपले बाळ जगात येण्याआधी, कधी जन्मानंतर लगेच, तर कधी जन्मानंतर एक-दोन वर्षात गमवावे लागते. बालविवाह हा कायद्याने गुन्हा तर आहेच पण आजच्या काळात हे असे घडणे म्हणजे नवीन विचार शक्तीला काळिमा आहे. त्यामुळे कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन तसेच गंगाई बहुउद्देशीय सेवा संस्था हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने बाल विवाह प्रतिबंध करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मंगला लोखंडे विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की अठरा वर्षाखालील मुली व एकविस वर्षाखालील मुले यांचा होत असलेल्या बालविवाहाला संरक्षण म्हणून व बालविवाहाला मुभा देणारे विवाह प्रसंगी उपस्थित राहणारे संबंधित व्यक्ती हे सर्व या कायद्याअंतर्गत गुन्हेगार ठरत असून त्याला प्रतिबंध म्हणून जिल्यातील तालुका ग्रामीण व शहरी भागातील माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय येथे बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत शपथ व कॅन्डल रॅली काढून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाला सहकार्य करणारे ग्रामीण भागातील गावातील सर्व स्थानिक पदधिकारी सरपंच, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सदर संस्थेचे सहायक तुषार रेड्डीवार कार्यकर्ते पायल मसराम, अमिषा मसराम प्रज्वल भेदुरकर उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

