पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- शहरामध्ये अग्निशस्त्रे जवळ बाळगणारे, शस्त्र पुरविणारे गुन्हेगारांवर लक्ष ठेवून कठोर कारवाई करणेबाबतचे निर्देश मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार यांचेकडून गुन्हे शाखेकडील अधिकारी यांना प्राप्त झालेले होते.पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर खंडणी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे देखरेखीखाली पथक माहिती काढीत असताना पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व सचिन अहिवळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे अग्निशस्त्र बाळगणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार आदिल करीम बागवान, वय-३५ वर्ष, रा. सर्व्हे नं.५७०, आंबेडकरनगर, गल्ली नं.६, मार्केटयार्ड, पुणे यास साईबाबानगर, मॅपल गार्डन जवळील लमानवस्ती चौक, कोंढवा, पुणे या ठिकाणी सापळा लावुन त्यास आज दि. ०९/११/२०२३ रोजी सकाळी ०७/१५ वाजता पकडून त्याचे ताब्यातून देशी बनावटीचे एकूण ०१ पिस्टल व ०२ जिवंत काडतूसे असा किं.रु. २६,०००/- चा मुददेमाल जप्त करून त्याचेविरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं. ११४४ / २०२३, भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ (२५). महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नमूद आरोपी विरुध्द यापूर्वी दुखापतीचे, दरोडा, घरफोडी व जबरी चोरीचे तसेच आर्म अॅक्टचे वारजेमाळवाडी, सांगवी, मार्केटयार्ड, सहकारनगर, कोथरुड, खडक, स्वारगेट, भारतीविदयापीठ, दत्तवाडी, वानवडी, येरवडा, हिंजवडी, हडपसर पोलीस स्टेशन येथे एकुण ५५ गुन्हे दाखल आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, सहा.पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे अंमलदार सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, विजय गुरव, ईश्वर आंधळे, सदोबा भोजराव शंकर संपते, पवन भोसले यांनी केलेली आहे.

