Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

वर्धा सामान्य रुग्णालयात हिप रिप्लेसमेन्ट व गुडघा प्रत्यारोपनची यशस्वी शस्त्रक्रिया, जन आरोग्य योजनेंतर्गत झाली शस्त्रक्रिया.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 10, 2023
in आरोग्य, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा सामान्य रुग्णालयात हिप रिप्लेसमेन्ट व गुडघा प्रत्यारोपनची यशस्वी शस्त्रक्रिया, जन आरोग्य योजनेंतर्गत झाली शस्त्रक्रिया.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबाईल :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 9:- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सामान्य रुग्णालय डॉ.सतिश नगलवाडे यांनी त्यांच्या पथकाद्वारे विवेक कडूकर या रुग्णाची हिप रिप्लेसमेन्ट तर अविनाश मोहर्ले या रुग्णाच्या गुडघ्याच्या प्रत्यारोपनाची अवघड असलेली शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली.

महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत सदर शस्त्रक्रिया करण्यात आली. या योजनेंतर्गत रुग्णांना आरोग्य सेवेचा मोठा लाभ मिळत आहे. सामान्य रुग्णालयात अस्थिरोग विभागात भरती झालेल्या सावंगी मेघे येथील विवेक कडुकर व वर्धा येथील अविनाश मोहर्ले या रुग्णांचा सदर योजनेंतर्गत सामाजिक, आर्थिक व जातीय जनगणनेनुसार शहरी व ग्रामीण कुंटूंबाच्या यादीत समावेश झालेला होता. त्यामुळे यायोजनेंतर्गत त्यांना लाभ देण्यात आला.

रुग्णालयात भरती झालेल्या दोन्ही रुग्णांची अस्थिरोग तज्ञ डॉ.सतिश नगलवाडे यांनी तपासणी व इतर आवश्यक तपासणी केली असता विवेक कडूकर या रुग्णाच्या कमरेच्या उजव्या बाजुचा हिप रिप्लेसमेन्ट करण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. त्यानुसार शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले. अविनाश मोहर्ले यांना डाव्या पायाच्या गुडघ्याचा त्रास असल्याचे जाणवले असल्याने त्यांना गुडघा प्रत्यारोपन करण्याचे नियोजन करुन दोन्ही रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

दोन्ही शस्त्रक्रीया अवघड असल्याने 5 ते 6 तास सदर शस्त्रक्रीया चालली व रुग्णांना होणा-या त्रासापासुन मुक्त करण्यात आले. ही शस्त्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सचिन तडस तसेच ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे अधिकारी डॉ.प्रविण धाकटे यांच्या मार्गदर्शनात अस्थिरोग तज्ञ डॉ.सतिश नगलवाडे व डॉ. वैभव गिरडे यांनी केली. यासाठी भुलतज्ञ डॉ. प्रशांत बोंडे, डॉ. तेजस्विनी, डॉ.निखिल तसेच माधुरी शिरपुरकर, अमोल बुटले, पंकज वाघमारे, निलिमा पेटकर, प्रांजली दरडे, दिप तुरणकर, आकाश समुद्र, मनोज मुन इत्यादींनी सहकार्य केले. योजनेचे कर्मचारी सुकेशनी बारमाटे, सारंग भुंबरे, समीर डेकाटे यांनी यशस्वी करण्याकरीता प्रयत्न केले. असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

Previous Post

खंडणी विरोधी पथक २ पथकाची दमदार कामगिरी ! देशी बनावटीचे ०१ कटटे व ०२ जिवंत काडतुसे बाळगणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारास केले अटक….

Next Post

कोरपना तालुक्यातील गट ग्रामपंचायत निमणी-हिरापूर येथे मग्रारोह योजना अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांनी बांधला श्रमदानातून वनराई बंधारा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कोरपना तालुक्यातील गट ग्रामपंचायत निमणी-हिरापूर येथे मग्रारोह योजना अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांनी बांधला श्रमदानातून वनराई बंधारा.

कोरपना तालुक्यातील गट ग्रामपंचायत निमणी-हिरापूर येथे मग्रारोह योजना अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांनी बांधला श्रमदानातून वनराई बंधारा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In