श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे बीड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात बीड प्रीमियर लीगचा थरार बीडकरांना आजपासून अनुभवयास मिळणार आहे. सहावे सिझन असणाऱ्या बी.पी.एल.चे उद्घाटन जिल्हाधिकारी सौ. दीपा मुधोळ-मुंडे, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी आयोजक, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेशभैय्या क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना क्रीडा प्रेमींच्या व खेळाडूंच्या विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे यावेळी व्यक्त करत सर्व खेळाडूंना पुढील खेळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, नगरसेवक शुभम धुत, क्रिकेट असोसिएशनचे सचिव आमेर सलीम, राजन साळवी, महेश वाघमारे, स्टार खेळाडू मुक्ता मगरे, रणजी प्लेअर सौरभ नवले, आमेर सिद्दीकी, शाहरुख पठाण यांच्यासह युवा खेळाडू, माझे सहकारी, प्रेषक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

