सौ. हनीशा दुधे तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
बल्लारपूर:- शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील ३२०० विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन तयार करून पुरवठा करण्याचे काम २८ महिला बचत गटातील जवळपास १४० महिला १५ वर्षा पासून अल्पशा मानधनावर काम करीत आहेत. अलीकडे न.प बल्लारपूर तर्फे शालेय पोषण आहार पुरवठा करण्याच्या कंत्राट युवक कल्याण बेरोजगार संस्थेस दिला आहे. त्यामुळे शहरातील जवळपास १०० महिला बेरोजगार होणार आहेत. यासंदर्भात दिनांक ०१/०९/२०२२ बसपा व शहर विकास आघाडी तर्फे न.प बल्लारपूरला युवक कल्याण बेरोजगार संस्थेत दिलेला कंत्राट रद्द करून, जुन्या महिला बचत गटास काम देण्यात यावे या मागणीकरिता दि. ०६/०९/२०२२ चे सकाळी १० वाजता पासून संयुक्त धरणे आंदोलनाची नोटीस शहर विकास आघाडीचे अध्यक्ष श्री भारत थुलकर, बसपाचे नेते श्री सरफराज शेख, शहर विकास आघाडीचे सचिव संजय डुबेरे, बसपाचे शहराध्यक्ष आसिफ शेख यांनी दिले. भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा व छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्यास मालार्पण करून धरणे आंदोलनास प्रारंभ झाले. धरणे मंडपात बचत गटाच्या महिला विविध मागण्याबाबत प्रचंड घोषणा बाजी करीत होत्या. धरणे मंडपात प्रास्ताविक अजहर अली यांनी केले, संचालन आसिफ शेख यांनी केले, बसपा नेते श्री सरफराज शेख व राजेश बोरकर यांनीसुद्धा मार्गदर्शन केले, मुख्य मार्गदर्शन बल्लारपूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष श्री भारत थुलकर यांनी केले. दुपारी २:३० वाजता मुख्य अधिकारी श्री विशाल वाघ यांनी मागण्यांचे निवेदन सादर करून युवक कल्याण बेरोजगार संस्थेस शालेय पोषण आहार पुरवठा करण्याच्या दिलेला कंत्राट रद्द करून, पोषण आहार पुरवठा करण्याचे काम जुन्या महिला बचत गटांना देण्यात यावी अशी मागणी केली. मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे रास्ता रोको आंदोलन करण्याची घोषणा आंदोलन कर्त्यांनी केली. या संदर्भात मुख्य अधिकारी यांना विचार विमर्श करून निर्णय जाहीर करण्यास दोन दिवसाची मुदत आंदोलन कर्त्यास मांगितली. निवेदन देताना शिष्टमंडळ पूर्णिमा वानखेडे, लता काकडे,अनिता शेरके, संगीता दौरेवार, गंगा मल्लोज्वार आदी उपस्थित होते. निवेदन दिल्यावर राष्ट्रगीताने धरणे आंदोलनाच्या समारोप करण्यात आला.

