🖋️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
अहमदनगर:- नगर तालुक्यातील कामरगाव, मठपप्री व चिचोंडी पाटील परिसरात दिवसा घरफोडी करणारा बीड जिल्ह्यातील सराईत आरोपी 63 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशा एकूण पावणेपाच लाखांच्या मुद्देमालासह आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केला आहे
28 ऑगस्ट 2022 रोजी फिर्यादी शामराव इंद्राजी आंधळे वय 60, रा. कामरगाव, ता. नगर हे कुटुंबासह कामानिमित्त बाहेर गेलेले असताना अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख असा एकूण 1 लाख 30 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
या घटनेबाबत नगर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा सराईत गुन्हेगार प्रवीण ऊर्फ भाजी हबाजी भोसले रा. पिपरखेड, ता. आष्टी, नि. बीडव त्याच्या साथीदारांनी मिळून केल्याचे समोर आले. भोसले व त्याचे साथीदार हे चोरलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी मोटारसायकलवर जामखेड रोडने नगरकडे येणार असल्याची रमाहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावून चिचोंडी पाटील गावाजवळ प्रवीण भोसले यास ताब्यात घेतले, तर एक आरोपी पळून गेला.