बल्लारपूर विधानसभा सचिव, युवक काँग्रेस चंद्रपूर यांनी विसापूर ग्रामपंचायत मार्फत प्रशासनाला पत्रव्यवहार करण्याबाबत देण्यात आले निवेदन.
सौ. हनीशा दुधे, तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
चंद्रपूर :- जिल्हातील बल्लारपूर तालुका येथील विसापूर गाव मधील दिनांक 07 ऑगस्टला चंद्रपूर जि. माजी पालकमंत्री विजयभाऊ वड्डेटीवार, चंद्रपूर- वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बालूभाऊ धानोरकर जिल्हाध्यक्ष ग्रामीण काँग्रेस कमिटी प्रकाशभाऊ देवतळे, बल्लारपूर तालुका मधील जेष्ठ नेते घनश्याम मुलचंदानी, बल्लारपूर तालुका ग्रामीण अध्यक्ष विनोदभाऊ बुटले, प्रदेश महासचिव यु.काँग्रेस महाराष्ट्र शिवानिताई वड्डेटीवार, जिल्हा उपाध्यक्ष यु.काँग्रेस चंद्रपूर रमीज भाई शेख, जिल्हाध्यक्ष ग्रामीण काँग्रेस कमिटी शंतनूभाऊ धोटे यांचा मार्गदर्शनाखाली विसापूर गावामधील प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव यु.काँग्रेस चंद्रपूर याचा नेतृत्वमध्ये विसापूर गावामधील असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक स्कूल व हायस्कूल मध्ये इंग्लिश CBSC माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्यात यावे यासाठी प्रशासनाला विसापूर ग्रामपंचायत मार्फत पत्रव्यवहार करण्यात यावे असे निवेदना मार्फत सांगितले आहे.
तसेच विसापूर गाव-मधील इंग्रजी माध्यमाकडे जास्ती जास्त मूल-जात असून गरिबांचे मुलांना इंग्रजी (CBSC) माध्यमिकचे शिक्षण प्राप्त करू शकत नाही* आहेत कारण कि प्रत्येक शिक्षण-साहित्य मध्ये पैसा द्यावे लागत आहेत खाजगी स्कूल व हायस्कूल-मध्ये इंग्रजीCBSC माध्यमिक शिक्षण हे महागडे असल्यामुळे आमचे गरिबांचे मूल इथे (CBSC) दर्जाचे शिक्षण प्राप्त करू शकत नाही आहेत म्हणून या निवेदन मार्फत मागणी करण्यात आले कि जिल्हा परिषद स्कूल व हायस्कूल मध्ये इंग्लिश CBSC दर्जाचे उच्च व माध्यमिक शिक्षण सुरु करून गरिबांचे मुलांना शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावे असे निवेदन मार्फत कळविण्यात आले.

