वाशीम जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशीम:- जिल्हातील मालेगाव तालुक्यातुन एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे मेव्हण्याने जॅक व कोयत्याने वार करुन आपल्याच जावयाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे.
जावयाला दारूचे मोठ्या प्रमाणात व्यसन असल्यामुळे मेव्हण्याने जावयाला दारु सोडविण्यास नेत असतांना जावयाने मेव्हण्यावर हल्ल्या केला त्याला प्रतिउत्तर देत मेव्हण्याने जावयावर जॅक व कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या केली. ही घटना झोडगा गावानजीक दिनांक 21 रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास घडली.
या घटनेची तक्रार नामदेव शिवाजी भुसारी वय 32 वर्ष रा. किनखेडा ता. जि. वाशीम मेव्हणा ने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचे बहीण जावई सुभाष दिगांबर मापारी रा. बोरी मापारी हे मला वाशीम बसस्थानक दारुच्या दुकानाजवळ भेटले. मी त्यांना सांगीतले की, आपल्याला दारु सोडविण्याकरीता बाहेरगावी जायचे आहे.
त्यानुसार दोघे वाहन क्र. एमएच 12 आर. एन. 9138 या वाहनाने ते जाण्यास निघाले. वाहन चालवित असतांना मालेगाव रस्त्याने झोडगा गावालगत 11.30 वाजताच्या सुमारास माझ्या बाजुला बसलेल्या जावयाकडून माझ्या सोबत दारु सोडविण्याच्या करणावरुन वाद घालून माझ्या डाव्या हातावर कोयत्याने वार केला. त्यानंतर मी वाहनामध्ये असलेला जॅक हातात घेवून जावयाच्या डोक्यावर मारला. त्यानंतर जावयाच्या हातातील कोयता हिसकावुन जावयावर कोयत्याने सपासप वार केले. जावई मरणासन्न अवस्थेत पडल्याने त्याला उचलून मी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीमध्ये टाकून दिले व कोयता तिथेच टाकून दिला. अशा आशयाची फिर्याद मालेगाव पोलीस स्टेशन येथे दिली.
त्यावेळी हेकॉ कैलास कोकाटे, शिवाजी काळे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता झोडगा बु. गावाजवळी जयस्वाल यांच्या बंद धाब्यासमोरील रस्त्याच्या बाजूला खोलगट नालीमध्ये मृतदेह आढळून आला. सदर इसमावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळून आले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने या सुभाष डिगांबर मापारी याचा मृत्यू झाल्याचे घटनास्थळी दिसून आले.
याबाबत प्राप्त फिर्यादीवरुन आरोपी मेहुणा नामदेव शिवाजी भुसारी रा. किनखेडा ह. मु. गणेश नगर काटा रोड वाशीम यांचेविरुद्ध कलम 302 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगावचे पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक योगेश धोत्रे करीत आहेत.

