हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- कॅट्टर्सचे खराब आणि सडलेल्या अन्न खाल्लामुळे अनेक मुक्या प्राण्याचे मृत्यू होत आहे. त्यामुळे कॅट्टरिंग वाल्याच्या हलगर्जीमुळे अनेक मुक्या प्राण्यावर जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे अनेक पशू पक्षी प्रेमी यांनी प्रशासनावर मोठा संताप व्यक्त केला आहे.
कॅट्टर्स ने फेकलेले अन्न खाल्ल्याने गायचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील रविंद्र वार्ड मध्ये घडली. शहरातील लॉन, मंगल कार्यालय मध्ये विवाह सोहळा, घरगुती कार्यक्रम मध्ये कॅटर्स कडून जेवण बनविले जातात. ज्यामध्ये रात्री उरलेले अन्न किंवा खराब झालेले अन्न रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात फेकले जाते, जे लोकांचे पाळीव प्राणी खातात व त्यात त्यांचा मृत्यू होत आहे.
नेमका हाच प्रकार रविवारी रवींद्र नगर वॉर्डात कारवा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर फेकले होते. त्यात एका गायीचा मृत्यू झाल्यानंतर उघडकीस आला आहे. शनिवारी रात्री उरलेला भात गायीने खाल्ल्याने रविवारी सकाळी गायीचा मृत्यू झाला. त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील कॅटरस कडून बनविले जेवण वाचल्यानंतर तसेच उष्टे अन्न त्याची विल्हेवाट न लावतात ते अन्न कारवा रोड, चंद्रपूर मार्गावरील रस्तेच्याकडे ला फेकून देतात. हे दोन्ही मार्ग शहराला लागून असल्यामुळे पाळीव प्राणी ते खातात व त्यात त्यांचा मृत्यू होत आहे. तसेच दोन्ही मार्गाला जंगल लागून असल्याने वन्यप्राणी सुध्दा ते अन्न खायला येण्याची शक्यता असते.
या घटनेनंतर अनेक गो रक्षक आणि प्राणी प्रेमी यांनी संताप व्यक्त करत. प्रशासनाने वेळीच सावध होऊन अशा व्यक्ती विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगर पालिका प्रशासन, वनविभाग याच्या कडे केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

