Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील टोळीला दरोड्याच्या तयारीत असताना पकडले, पोलिसांनी 5 आरोपींना ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 28, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील टोळीला दरोड्याच्या तयारीत असताना पकडले, पोलिसांनी 5 आरोपींना ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम, नागपुर शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात क्राईम ग्राफ वाढत आहे. त्यात चोरी, हत्या प्रकरण वाढत असल्याने पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे. अशातच अंतर राज्यातील चोराच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे.

नागपूर गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसरात गस्तीदरम्यान उत्तर प्रदेशातील एका टोळीला दरोड्याच्या तयारीत असताना पकडले. पोलिसांनी 5 आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या कडून शस्त्रास्त्रासह 15 लाख 44 हजार 600 रुपयांचा माल जप्त केला. ही टोळी कुठेतरी मोठा दरोडा टाकण्याचा तयारीत होती, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

नागपूर गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने आरोपी इरशाद अली नौशाद अली वय 30 वर्ष, बद्रुद्दीन इदरीस चौधरी वय 34 वर्ष विनोद राजमन गौतम वय 32 वर्ष, मोहम्मद शरीफ नुसरत अली वय 21 वर्ष आणि फरियाद अशरफ अली चौधरी वय 27 वर्ष, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी उत्तरप्रदेशच्या सिद्धार्थनगर येथील रहिवासी असून या सर्वांना अटक केली आहे.

शनिवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास पोलिस पथक कामठी परिसरात गस्त घालत होते. गादा गाव मार्गावर पोलिसांना एक कार आणि पिकअप वाहनात काही लोक संशयास्पदरित्या जाताना दिसले. घेराबंदी करून पोलिसांनी वरील पाचही आरोपींना पकडले. झडतीमध्ये त्यांच्याजवळ दोन चाकू, पेचकस, तीन कटर आणि तिखट मिळाले. त्यांना ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता आरोपींवर सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली. आरोपी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन घरफोडी करतात. आरोपी एटीएम फोडण्याच्या तयारीने शहरात फिरत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यांच्याविरुद्ध आर्म्स ॲक्ट आणि दरोड्याच्या तयारीचा गुन्हा नोंदवून नवीन कामठी पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. ही कारवाई पोनि राहुल शिरे, सपोनि विक्रांत थारकर, पोउपनि आशीषसिंग ठाकुर, पोहवा प्रमोद वाघ, महादेव थोटे, राजूसिंग राठोड, गौतम रंगारी, रामचंद्र कारेमोरे, रोनाल्डो एंथोनी, टप्पूलाल चुटे, सुशील गवई, सुशील श्रीवास, आशीष पवार आणि सुधीर तिवारी यांनी केली.

Previous Post

दि बल्लारपूर कॉलरी एम्प्लॉइज को -ऑप सोसायटीच्या निवडणुकीत चेतन गेडाम विजयी.

Next Post

ठाणे शहरातील चंदनवाडी विभागात नव्याने तयार झालेल्या घराचे झोपडपट्टी लाभार्थ्यांना 400 चाव्यांचे वाटप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ठाणे शहरातील चंदनवाडी विभागात नव्याने तयार झालेल्या घराचे झोपडपट्टी लाभार्थ्यांना 400 चाव्यांचे वाटप.

ठाणे शहरातील चंदनवाडी विभागात नव्याने तयार झालेल्या घराचे झोपडपट्टी लाभार्थ्यांना 400 चाव्यांचे वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In