अर्पित वाहाणे आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- २६ नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे.या दिवशी देशभरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाची मूल्ये रुजविनारे संविधान भारताला अर्पण केले आहे. आणि हेच संविधान २६ जानेवारी १९५० रोजी (प्रजासत्ताक दिनी) प्रत्येक भारतीय नागरिकास लागू झाले आहे.
भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लागले. याच संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. म्हणूनच आजच्या युगात तरुणांनी संविधानाची मूल्ये रुजविली पाहिजे व संविधान दिन साजरा केला पाहिजे. भारतीय संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता टिकून आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हा आपल्या लोकशाहीचा शक्तिशाली आधारस्तंभ आहे. संविधाना वरील संकट हे लोकशाहीवरील संकट असणार आहे; त्यामुळे आपले संविधान आणि लोकशाही निर्विघ्न राहिल यासाठी सर्वांनी सजग राहण्याची गरज आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष तथा पेट्रोल पंप हटाव कृती समिती वर्धा चे निमंत्रक महेंद्र मुनेश्वर यांनी सिध्दार्थ नगर (बोरगांव मेघे) येथील संविधान दिन व संविधान चौक नामकरण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून केले.
यावेळी समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष राहुल झांबरे यांच्या मार्गदर्शनात सिध्दार्थ नगर, (बोरगांव मेघे) येथिल चौकाचे संविधान चौक असे नामकरण करणारा कार्यक्रम संविधान दिनी २६ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ७.०० वाजता घेण्यात आला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विशाल मानकर, एड.उज्जल हाडके, सतिश इंगळे, आशिष गुजर, देवानंद दखणे, सुदाम सकट, विनायक मुनेश्वर, बंडू फुलझेले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली.
या कार्यक्रमाच्या आयोजक सुरेखा झांबरे, छाया पाटील, अनिता पोहनकर, रंजना मेश्राम, रत्नमाला जुनगडे, मायाबाई भगत, सुनिता पाटील, सुनिता चाटे, पायल मेश्राम, संबोधी झांबरे, पूर्वी मेंढे, प्रतीक पाटील, अंकित पाटील, सुमेध अंबुलकर, हरीश पोहनकर, गणेश मळावी, नरेश फुलझेले, धनराज जुनघडे, अश्विन साठे, राजू पाटील, प्रीतम दिवेकर, सोहम पाटील, संविधान अंबुलकर, भानुदास पेंदाम, अमोल कांबळे, मनीष साठे, पंकज एसनकर, शंकर पोहनकर, किशोर पाटील, प्रवीण कांबळे, मनीष मुनेश्वर, अतुल अवथरे, सोनुल भगत आदींनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम केले.
यावेळी संविधान दिन… भारतीय संविधान चिरायू होवो, असा जय घोष करुन संविधान प्रभात फेरी काढण्यात आली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाची मूल्ये भारतीयांच्या मनात रुजविनारे संविधान बाबासाहेबांनी भारताला अर्पण केले आहे. हेच ते संविधान आहे.धर्मांधवादी कितीही संविधानाच्या विरोधात ओरडत राहिले तरी सुध्दा सर्वांचे रक्षण करण्यास व लोकशाहीला मजबूत करण्यास भारताचे संविधान तटस्त आहे. असेही आंबेडकरी नेते महेंद्र मुनेश्र्वर मार्गदर्शनातून म्हणाले. तसेच यावेळी भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीकारकांच्या शोर्य गाथेचे स्मरण करून २६/११ मुंबई हल्ल्यातील मृतांना आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन व संविधान उद्देशिका – प्रस्तावना वाचन करुन राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.सुत्र संचालन समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष राहुल झांबरे यांनी केले तर बंडू फुलझेले यांनी सर्वांचे आभार मानले.

