मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शिक्षणाचे जनक क्रांतिबा महात्मा फुले यांच्या पुण्यतीथी निर्मित हिंगणघाट शहरातील सांस्कृतिक सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची अध्यक्षता माजी शिक्षण सभापती अनिल भोंगाडे यानी केली. यावेली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार केशव तितरे, संदेश मुन, रविन्र्द भगत, बालु मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला मार्लार्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रसंगी मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या जीवन चारित्रावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रम संचालन केशव तितरे तर प्रास्ताविक माजी शिक्षण सभापती अनिल भोंगाडे यांनी केले. आभार राजर्शि शाहु महाराज पत संस्थेचे अध्यक्ष रविद्र भगत यांनी मानले.

