प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- संत तुकडोजी वार्ड येथील श्रेया महिला बचत गटातील सभासद कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. संस्थेमार्फत उपाध्यक्ष मंगला लोखंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना एड्सविषयी समज-गैरसमज यांची विस्तृत माहिती दिली.
एचआयव्ही हा एक गंभीर आजार आहे जो एका प्रकारच्या प्राणघातक संसर्गामुळे होतो. एड्सचे पूर्ण नाव ‘अक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम आहे. हा एक प्रकारचा विषाणू आहे, ज्याचे नाव एचआयव्ही ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस आहे. या आजारात संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर हा व्हायरस हल्ला करतो. त्यामुळे शरीर सामान्य आजारांशीही लढण्यास असमर्थ ठरते. विशेष म्हणजे हा आजार तीन टप्प्यात होतो प्राथमिक अवस्था, वैद्यकीय विलंब आणि एड्स.
एड्सबाबत आपल्या समाजात अनेक गैरसमज आणि भीती आहे. त्यामुळे, या आजाराने ग्रस्त लोकांना समाजात आजही लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागतो. या आजाराबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी ०१ डिसेंबर रोजी ‘जागतिक एड्स दिन’ साजरा केला जातो. या दिवशी, लोकांना त्याच्या प्रतिबंध आणि चाचणीबद्दल जागरूक केले जाते.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शारदा भगत, सविता तराळे, सुवर्णा पडोळे, सारिका बोकडे, सोनाली निनावे, वैशाली साटोणे, वैशाली घोडे, मनिष राऊत, यश पडोळे, मंगला समर्थ, निर्मला चौके, शुभांगी गिरडे, आरती क्षीरसागर, सोनाली वाघमारे, वैशाली वासेकर, शशिकला अस्वले, लतीका काकडे, माया व्यापारी इत्यादींनी सहकार्य केले.

