✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील वडनेर येथे सिख समाज धार्मिक स्थळ गुरुद्वारा मागील ४० वर्षांपूर्वी पासून आहे सदर गुरुद्वारामध्ये आमचे समाजाचे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही पूर्वीपासून करीत आहो. गुरुद्वारा परिसरात लागून असलेली ग्राम पंचायत वडनेरची जागेवर १५ ते २० वर्षापासून गुरुद्वारा कमेटी आमचे धार्मिक कार्यक्रम करत आहोत. तसेच प्रत्येक कार्यक्रमाचे महापुरुषात त्या जागेवर कार्यक्रम करत आहोत सदर जागेवर कमिटी यांचे ताब्यात व वापर आहे.
आज पर्यंत ग्रामपंचायत वडनेर यांचे या जागेवर कडून कारवाई व सदर जागेवर वापराबद्दल कोणत्याही प्रकारची दखल न देता नोटीस न देता करण्यात आले नाही कोणतेही कागदपत्राची कारवाई झालेली नाही, परंतु दिनांक २७ नोव्हेंबर च्या मध्यरात्री गुरुनानक जयंतीचा कार्यक्रम आटोपल्या नंतर आम्हाला कोणत्याही प्रकारची सूचना न देता व करिता माहिती न देता आदिवासी समाजाचे नागरिकांनी राजकीय समाजकंटकांनी दोन समाजामध्ये तेळ निर्माण करण्याचे उद्देशाने आपले आदिवासी समाजाच्या झेंडा लावण्यात आला.
ग्रामपंचायत वडनेर सरपंच कविता वानखेडे व सचिव रामटेके यांनी आपल्या खुर्चीच्या गैर व्यापार करून राजकारण करण्याचे दृष्टिकोन समाजाच्या समाज मध्ये आपसी वाद निर्माण व्हावा या उद्देशाने आपसी राजकीय विद्यमान सरपंच यांचे पती विनोद वानखेडे पोळी शिकत आहे.
शिख समाज व आदिवासी समाजमध्ये कोणताही वाद निर्माण होऊ नये गाव शांत पूर्वक वातावरण करावे याकरिता दोन्ही समाजाचे समाधान व्हावे याकरिता शांतता पूर्वक तोडगा करण्यात यावा.
गावात आज पर्यंत कोणतेही समाजापासून समाजामध्ये शांतता भंग करण्यात आयुक्त झाले नाही परंतु राजकारण समाजकंटक मुळे दोन समाज समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहे.
सर्व गावात शांतता वातावरण राहायचे दृष्टिकोनाने लवकरात लवकर योग्य चौकशी करून न्याय देण्यात यावी ही विनंती सिख बांधवाकडून करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना उपस्थित गुरुद्वाराध्यक्ष गुरुमुखसिंघ जुनी, सेवकसिंग बावरी, संगतसिंग जुनी, विजेंद्रसिंग जुनी, प्रेमसिंग जुनी, सेवकसिंग जुनी, तकदीर सिंगापूर जुनी, राणा सिंग बावरी,रामसिंग बावरी, करणसिंग जुनी, अर्जुन सिंग जुनी,जंगसिंग टाक, गोलू सिंग टाक, जसपाल सिंग जुनी, निशांत सिंग जुनी, नानक सिंग जुनी, राज सिंग जुनी व सर्व गुरुद्वारा कमेटी उपस्थित होते.

