विश्वनाथ जांभूळकर, एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ? ऑनलाईन एटापल्ली:- दिनांक 09 डिसेंबर रोज शनिवारला परधान समाज संघटना एटापल्ली कार्यकारणी घटित करण्यासाठी कन्यका मंदिर एटापल्ली येथे समाज बांधवांसाठी सभा घेण्यात आली. या सभेचा अध्यक्ष पदी प्रा. गणेश आत्राम हे होते. तसेच प्रमुख पाहुणे डॉ. सचिन कन्नाके, डॉ. वी. मडावी , शंकर तोरे, वसंत मडावी, तुकाराम मडावी, हरीश कुमरे, गोसाई तोरे,रामदास मडावी, प्रवीण आत्राम, सौ. सीडाम मॅडम, सौ. वरखडे आधी मान्यवर उपस्थित होते.
सदर सभेमध्ये परधान समाज एटापल्ली कार्यकारणीची सर्वानुमते व बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्ष म्हणून योगेश नगभिडकर, उपाध्यक्ष श्री रवींद्र पेंढारकर व उमेश सिडाम, सचिव पदी राहुल कुळमेथे, कोष्ध्यक्ष पदी स्वानंद मडावी व राजेश सडमेक, तालुका प्रचारक प्रमुख एकनाथ मडावी , प्रसिद्धी प्रमुख प्रा. संतोष सिडाम सर महिला प्रतिनिधी सौ. भवणाताई वसंत मडावी व कु. अरुणा सिडाम सल्लागार समिती प्रमुख श्री. शंकर तोरे सर (प्रा. शी), प्रा. गणेश आत्राम सर, वसंत मडावी सर (प्रा. शि.), प्रवीन आत्राम, हरीश कूमरे, अरुण आलांम, आश्विन पेंदोर, सदस्य म्हणून सर्व समाज बांधव इत्यादी ची नियुक्ती करण्यात आली.

