मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडाचा आज निकाल लागला. 2011 साली नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांचे जळीतकांड झाले होते. त्यावर आज नाशिक जिल्हयातील जिल्हा व अप्पर सत्र न्यायालय मालेगाव येथे सुनावणी होती. त्यादरम्यान मुख्य आरोपी पोपट शिंदेसह तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपीचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकूण 15 आरोपींचा समावेश होता. उर्वरित काही आरोपींवर मोक्काच्या कारवाईची मागणी पोलिसांनी केलेली होती.
अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडाची सुनावणी झाली त्यात मालेगाव जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2011 मध्ये घडलेल्या महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या या घटनेचा निकाल तब्बल 11 वर्षांनी लागला आहे.
नाशिक जिल्हात मालेगाव येथे मोठ्या प्रमाणात इंधन तस्करी असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी सोनवणे यांना मिळाली होती. 25 जानेवारी 2011 ला ते इंधन तस्करावर छापा मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी यांना जिवंत जाळून ठार मारन्यात आले होते. यामध्ये एकूण पाच जणांना अटक करण्यात आली होती.
मुख्य आरोपी पोपट शिंदे ही देखील या प्रकरणात जळाले गेले होते त्यांनंतर त्याचा मृत्यू झाला होता. तर कुणाल शिंदे हा त्यावेळी अल्पवयीन होता. याशिवाय मच्छिंद्र सुवडकर, राजू शिरसाठ आणि अजय सोनवणे हे आरोपी होते. याच तिघांना आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मनमाड जवळ पानेवाडी येथे अनेक इंधन कंपन्या आहेत. त्याचाच फायदा घेऊन अनेक इंधन तस्कराचा या भागात वावर असतो. पानेवाडी गावाजवळ अनेकांनी त्यावेळी हॉटेल सुरू करून त्याआडून इंधन तस्करी सुरू केली होती.
मोठ्या प्रमाणावर इंधन तस्करी सुरू असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना लागल्याने त्यांनी शिंदे यांच्या हॉटेलवर धाड टाकली होती. याचवेळी आरोपींनी सोनवणे यांच्यावर इंधन टाकून जळाले होते त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
शिक्षेची सुनावणी होताच आरोपी न्यायालयातच कोसळला
या घटनेतील आरोपी हे जामिनावर होते आज सुनावणी दरम्यान ते मालेगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर होते न्यायाधीश डी वाय गोंड यांनी आरोपींना शिक्षा सुनावली शिक्षा ऐकताच आरोपी नंबर दोन मच्छीन्द्र सुरवडकर याला छातीत दुखायला लागले व तो तेथेच कोसळला त्याला तात्काळ सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

