राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी
मुंबई, 7 सप्टेंबर:- मुंबई च्या उपनगर ठाणेतील अंबरनाथ येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका सूनेन आपल्या सासूची हाताची तीन बोटे चावली त्यामुळे सासू गंभीर जख्मी झाल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
सासू -सूनेचे आपण अनेक घरात भांडण बघितले, कधी कधी छोट्या छोट्या भांडणांचा खूप गंभीर परिणाम समोर येत असतो, अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ भागात झालेल्या सासू-सूनेच्या भांडणात घडला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या भांडणातून सूनेनं सासूची चक्क तीन बोटे चावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सूनेनं आपल्या वृद्ध सासूच्या हाताची तीन बोटे चावली. एवढंच नाही तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या आपल्या पतीलाही महिलेनं मारहाण केली. या घटनेनंतर सासूनं पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या सूनेविरोधात तक्रार केली आहे.
टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितलं म्हणून सूनेनं सासूची तीन बोटे चावल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे येथील अंबरनाथ येथे घडला आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सासू रुशाली कुलकर्णी वय 60 वर्ष आपल्या घरी भजन करत होत्या. यादरम्यान त्यांनी त्यांच्या सुन विजया कुलकर्णी वय 30 वर्ष हिला टीव्हीचा आवाज कमी करायला सांगितला आणि नंतर उठून टीव्ही बंद करून टाकला. यामुळं चिडलेल्या विजया हिचा सासू रुशाली हिचा वाद झाला. हा वाद इतका वाढला की, विजया हिने आपल्या वृद्ध सासूनची तीन बोटे चावली. आपल्या वृद्ध आईला वाचवण्यासाठी आलेल्या पतीलाही विजया यांनी मारहाण केली. या घटनेनंतर सासू रुशाली यांनी आपल्या सूनेविरुद्ध तक्रार केली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली.

