✒️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी:- राहुरी शहरातील आझाद चौक परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस पथकाने छापा मारला. यावेळी रोख रक्कमसह सात जुगार्यांना पोलिस पथकाने छापा टाकत ताब्यात घेतले आहे.
राहुरी शहरातील आझाद चौक परिसरात जुगार अड्डा सुरू आहे, अशी गुप्त खबर राहुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राहुरी पोलिस पथकाने दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजे दरम्यान या अड्ड्यावर छापा मारला. त्यावेळी तेथे काही तरुण तिरट नावाचा जुगार खेळताना दिसून आले.
पोलिस पथकाने सगळ्यांची धरपकड करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पत्त्याचे कॅट व 1 हजार 690 रुपये असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस उपनिरीक्षक ज्योती डोके यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रताप प्रभाकर काशीद वय 31, रा. आझाद चौक, आदित्य बंडू पोपळघट वय 20, रा. तनपुरेवाडी, मनोज दत्तात्रय डोंगरखोस वय 25, रा. आझाद चौक, शशिकांत श्रीधर कोरडे वय 29, रा. बुरूडगल्ली, मंगेश राजेंद्र कोरडे वय 28, रा. डावखर वस्ती, किरण दत्तात्रय जाधव वय 26, रा. तनपुरेवाडी, अक्षय सर्जेराव तनपुरे रा. तनपुरे गल्ली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तापास पोलिस करत आहे.

