यावेळी अनेक नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड वाटप.
देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- वानाडोंगरी प्रभाग क्र. ८ मध्ये नुकतेच प्रगत जेष्ठ नागरिक मंडळ तर्फे दत्ता मेघे आयुर्वेदिक रुग्णालय वानाडोंगरीच्या सहाय्याने मोफत रोग निदान शिबिर व आयुष्यमान भारत कार्ड वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या शिबिरात जेष्ठ नागरिक व परिसरातील एकूण २०० लोकांना लाभ मिळाला आणि या शिबिरास परिसरातील नागरिक यांचे कडून भरपूर प्रतिसाद मिळाला. या शिबिरात प्रामुख्याने डॉ. प्रफुल्ल फडणवीस, डॉ. स्वानंद जोशी, डॉ. मृणाली धारपुरे, डॉ. किरण हरिणखेडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाची प्रार्थना “खरा तो एकची धर्म ” म्हणण्यात आली. या कार्यक्रमास माजी नगरसेवक बालु मोरे, प्रकशभाऊ डाखळे (पाटील), रवी येते, निलेश झिले, सविता डाखळे व अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लीलाधर बेंद्रे, मधुकरराव काथोटे, डॉ.प्रमोद मातकर, विनोद चंदनखेडे, देवराव पवार, मधुकर घोडमारे, गुलाबराव मानकर, अनिल चंदनखेडे, अशोकराव ठाकरे, दिगंबरराव खुसपरे, कौसल्याबाई बल्की आदींचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

