सर्वांना आई, बहिण आणि पत्नी हवी पण मुलगी का नको?: शिक्षक लक्ष्मण रत्नम यांचे प्रतिपादन
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुलचेरा:- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या येल्ला येथे आज दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येल्ला येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या शाळेचे मुख्याध्यापक श्री तिरुपती आरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून येल्ला गावातील ज्येष्ठ नागरिक सौ. दैनाबाई शंकर उराडे सौ. आश्लेषा रुपेश रामटेके ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करतांना या शाळेचे सहशिक्षक लक्ष्मण रत्नम यांनी म्हटले की, ‘सर्वांना आई, बहीण, पत्नी हवी हवीशी वाटते पण मुलगी का नकोशी वाटत असेल? मुली शिकल्या पाहिजे, पुढे गेल्या पाहिजेत. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी असे महत्वपूर्ण प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण या शाळेतील मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशात शाळेत आल्या व नृत्यही साजरा करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात शाळेतील मुला, मुलींनी आपापले मनोगत व्यक्त केले तर काहींनी गीत गायन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक सर्वश्री केशव गुंड, चंदू मडावी, कोटेश्वर पुण्यमूर्तीवार यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन इयत्ता 7 वी मधील पियुष रामदास झाडे याने तर आभार शिक्षक चंदू मडावी यांनी मानले.

