Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home ठाणे

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होताना शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे पाहणार अयोध्येला जाणार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 8, 2024
in ठाणे, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होताना शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे पाहणार अयोध्येला जाणार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले.

नितीन शिंदे ठाणे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- आयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना मिळाले असून या सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचे त्यांनी मान्य केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी आज सकाळी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन त्यांना अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी आमंत्रित केले. या आमंत्रणाचा शिंदे यांनी स्वीकार करून अयोध्येला येण्याचे मान्य केले आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याच भावनेतून भारतीय जनता पक्षाचा जुना सहकारी आणि एनडीएमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेलाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना राज्यातही 18 ते 22 जानेवारी दरम्यान अनेक उपक्रम आयोजित करून हा क्षण एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा असे आवाहन तमाम शिवसैनिकांना आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी घरावर भगवे ध्वज, दारासमोर पणत्या, परिसरात भगव्या पताका, आणि मंदिरांना विद्युत रोषणाई करून हा क्षण मोठ्या प्रमाणात साजरा करावा असे आवाहन यापूर्वीच करण्यात आले आहे. त्यासोबतच पक्षाच्या मुख्य नेत्याला या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाल्याने पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जावे अशी स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. स्वर्गीय आनंद दिघे यांनीही अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी ठाण्यातून चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती. रामजन्मभूमी आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. या साऱ्यांचे स्वप्न साकार होत असताना हा क्षण प्रत्यक्ष उपस्थित राहून याची देही याची डोळा पाहणे ही आपल्यासाठी परम भाग्याची गोष्ट असल्याने अयोध्येतील या अभूतपूर्व सोहळ्याला आपण नक्की उपस्थित राहू असे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले असून अयोध्येला येण्याचे मान्य केले आहे.

Previous Post

अखेर संविधान चौक आजनसरा चौफुली येथे पांढरे पट्टे मारून ब्रेकर लावण्याच्या गूरूदयाल सिंग जूनी यांच्या मागणीला यश.

Next Post

नौपाडा रक्षकच्या हजरबाबी पणामुळे पुन्हा एकदा दुर्घटना टळली.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नौपाडा रक्षकच्या हजरबाबी पणामुळे पुन्हा एकदा दुर्घटना टळली.

नौपाडा रक्षकच्या हजरबाबी पणामुळे पुन्हा एकदा दुर्घटना टळली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In