जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांच्या उपस्थितीत कार्यकारणी बैठक संपन्न
मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी
अहेरी:- गडचिरोली जिल्ह्यातील तालुका अहेरी येथील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्ता बैठक घेऊन दिंनाक १० सप्टेंबर शनिवारला ठीक १२:०० वाजता मॅपिंग शिबिर राबविण्यात आले यावेळी जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ता हजर झाले असता त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
गडचिरोली जिल्हात आम आदमी पक्ष कसा वाढणार आम जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपने नेहमी पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांनी आपले काम केलं पाहिजे.
यावेळी जिल्हा सचिव भास्कर इंगळे, शंकर चेनूरवार, अमन साखरे, साईनाथ सातपुते, विलास रापत्तीवार, छत्रपती गोवर्धन, प्रशांत जोशी, अतूल शिंगरु, सूधाकर आत्राम, विलास नैताम, अश्विन आत्राम, ताराचंद भूरर्से, रुपेश अडगोपूलवार, शसिंकात निस्टोरी, अविनाश भिमनपल्लीवार, भारती येनगंटीवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.