रेल्वेमंत्र्याची भेट घेऊन प्रश्न निकाली काढणार : खासदार रामदास तडस
प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट रेल्वे येथे एक्सप्रेस गाड्यांचा थांबा मिळावा या करिता गुरूवार दि. 15 रोजी वर्धा-बल्लारशाह यात्री संघाकडुन अध्यक्ष राजेश कोचर यांनी खासदार रामदास तडस यांची वर्धा कार्यालयात भेट घेतली. वर्धा-बल्लारशाह यात्री संघाकडुन खासदार रामदास तडस यांना हिंगणघाट रेल्वे स्टेशन गाड्यांचा थांबा संबंधित चर्चा करून सविस्तर माहिती दिली.
वर्धा-बल्लारशाह यात्री संघ यांच्या नेतृत्वात गेल्या पाच वर्षापासून हिंगनघाट रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस गाड्यांचा थांबा मिळावा म्हणून भरपूर आंदोलने चर्चा बैठकी झाल्या परंतु हिंगनघाट रेल्वे स्टेशनला थांबा मिळत नसुन फक्त सहानुभूती पत्र व आश्वासन मिळतं आहे.
कोविडच्या आधी हिंगनघाट रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस गाड्यांचा थांबा होता. परंतु कोविड परिस्थिती सामान्य झाल्यानंतरही गाड्याचा थांबा सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परिस्थिती खराब होतं चाललेली आहे व आता लवकरच परीक्षा सुद्धा सुरू होणार आहे. हिंगनघाट रेल्वे स्टेशन वरून अनेक गावातील विद्यार्थी वर्धा, नागपूर, अमरावती या शहरांमध्ये उच्च शिक्षणाकरिता जातात, आणि रेल्वे प्रवास हेच एकमेव साधन आहे. रेल्वे प्रशासनाने फक्त आश्वासने आणि सहानुभूती पत्र दिले परंतु गाड्यांचा थांबा सुरू केला नाही त्यामुळे तुम्ही यामध्ये मध्यस्थी घेऊन लवकरच गाड्यांचा थांबा सुरू करावा अशी चर्चा करण्यात आली.
लवकरच प्रलंबित रेल्वे गाड्यांच्या थांबाचा प्रश्न मार्गी लावणार व स्वतः रेल्वे मंत्र्यांसोबत व अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून हा प्रश्न लवकर मार्गी लावणार असे वर्धा-बल्लारशा संघाला खा. रामदास तडस यांनी सांगितले.
या निवेदनात बल्लारशाह-मुंबई ट्रेन रोज सुरू करावी, बल्लारशाह-पुणे ही गाडी रोज सुरू करावी, काजीपेट-पुणे ही एक्सप्रेस साप्ताहिक आहे तीला रोज सुरू करण्यात यावे, भुसावळ-वर्धा मेमो पॅसेंजर बल्लारशाह पर्यंत वाढवावी, बल्लारशाह- वर्धा मेमो प्रवाशांनी वेळेवर प्रवास करावा, नागपूर माजरी-आदिलाबाद पॅसेंजर सुरू करावी, अजनी-काजीपेट पॅसेंजर सुरू करावी आणि कोरबा, इंदौर, रायपूर, जोधपूर, हिसरा (बिकानेर), धनबाद-कोल्हापूर एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांचा अप आणि डाऊन रेल्वे थांबा हिंगणघाट रेल्वे स्टेशन देण्यात यावा, हिंगणघाट रेल्वे स्थानकावर सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, बल्लारशाह स्टेशनवर पिठ लाईन लवकर सुरू करावे, नागपुर-बल्लारशाह सेक्शनमध्ये मेट्रो सुरू करावे, दक्षिणेकडे जाण्यासाठी फूट ब्रिज बांधावा आदी विविध मागण्यांसाठी वर्धा-बल्लारशाह यात्री संघटनेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खा. हंसराज अहीर, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, महाप्रबंधक रामकरण यादव मुंबई यांना या मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या. रेल्वे गाड्यांचा पुन्हा थांबा देण्यात यावा अशी मागणीचे निवेदन यात्री संघाचे अध्यक्ष राजेश कोचर, सचिव डि.के. गुरनुले, विजय मुथ्था, दिलीप बालपांडे, रवि जुमडे, मो. शहजाद, लिलाधर मडावी, प्रा. किरण वैद्य, चंदशेखर खापरे, संजय खत्री आदींची उपस्थिती होती.

