उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला, दि.16:- आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता उमेदवारांकडून विविध प्रचार बाबींवर होणारा खर्च मोजण्यासाठी दर निश्चितीची कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.
आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणूक उमेदवार खर्च गणनेसाठी दरनिश्चिती समितीच्या बैठकीत ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, जिल्हा कोषागार अधिकारी मनजीत गोरेगावकर व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
निवडणूकीपासून निवडणूक संपेपर्यंत राजकीय पक्ष व उमेदवार यांच्याकडून जो खर्च केला जाईल, त्या सर्व बाबींचे दर जसे भोजन, नाश्ता, चहापान, हॉटेल विश्रांती, टीव्ही, संगणक, इंटरनेट भाडेतत्वावर घेणे, सोशल मीडिया वापर, बॅनर, पत्रके छपाई, वृत्तपत्र, टीव्ही जाहिराती, मंडप साहित्य, वाहतूक व्यवस्था, झेंडे आदी विविध बाबी निश्चित करावयाच्या आहेत. शहरी व ग्रामीण स्थानिक बाजारपेठेतून दर विचारात घेऊन निवडणूक खर्चाची जिल्हा दरसूची तयार करावी. संपूर्ण तपासणी व पडताळणी करून ही कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

