Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

बल्लारपूर महासंस्कृती महोत्सव “गर्जा महाराष्ट्र माझा” कलाविष्काराच्या माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा व संस्कृतीचे घडले दर्शन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 20, 2024
in चंद्रपूर, मनोरंजन, विदर्भ
0 0
0
बल्लारपूर महासंस्कृती महोत्सव “गर्जा महाराष्ट्र माझा” कलाविष्काराच्या माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा व संस्कृतीचे घडले दर्शन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर :- जात्यावरच्या ओव्या, भूपाळी, भारुड, गवळण, मंगळागौर यातून महाराष्ट्राची संस्कृती, मराठी माणसाची दिनचर्या तसेच महाराष्ट्रात साजरे केले जाणारे विविध सणसमारंभ व उत्सवाची झलक “गर्जा महाराष्ट्र माझा” या कलाविष्कारातून सादर करण्यात आली. या माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडले. औचित्य होते बल्लारपूर, महासंस्कृती महोत्सवाचे. स्थानिक कलाकारांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या “गर्जा महाराष्ट्र माझा” कलाविष्कार तसेच वाघनृत्य, शिवमहिमा, गीत, संगीत आणि नृत्याविष्कार सादर करुन बल्लारपूरकरांची मने जिंकली. बल्लारपूर महासंस्कृती महोत्सव कार्यक्रमात यामुळे उत्तरोत्तर रंगत येत गेली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगांवकर, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार ओमकार ठाकरे, चंदनसिंह चंदेल आदी उपस्थित होते.
बल्लारपूर शहराला 600 वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने सांस्कृतिक कार्य संचालनालय, जिल्हा प्रशासन आणि बल्लारपूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने, बल्लारपूर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्वप्रथम सतीश कणकम यांनी साकारलेले जय शिवराय वाघनृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर नवरंग डान्स अकॅडमी मार्फत गणेश जन्म, शिवतांडव, शिव अघोरी नृत्य आदीवर आधारित शिवमहिमा सादर करण्यात आले. तसेच स्पार्क जनविकास फाउंडेशन, चंद्रपूर निर्मित “गर्जा महाराष्ट्र माझा” या कलाविष्कारातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. नवोदित कलावंताना व्यासपीठ मिळावे या उद्देशातून गर्जा महाराष्ट्र माझा कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. सुमारे 100 कलावंतांच्या या संचामध्ये सहा महिन्याच्या बालकपासून 70 वर्ष वयाचे कलावंत आहेत. या कलाविष्काराचे दिग्दर्शन प्रज्ञा जिवनकर, संकल्पना आनंद आंबेकर तर मार्गदर्शन संजय वैद्य व गोलू बारहाते यांचे लाभले.

Tags: बल्लारपूर नगर पालिकाबल्लारपूर महासंस्कृती महोत्सव
Previous Post

स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून विविध कारवाही मध्ये मोहा दारू भट्टयावर धडक कार्यवाही.

Next Post

पोलिसांनी रस्त्यावरच महिलेची अंत्ययात्रा थांबवली, आणि समोर आला धक्कादायक प्रकार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पोलिसांनी रस्त्यावरच महिलेची अंत्ययात्रा थांबवली, आणि समोर आला धक्कादायक प्रकार.

पोलिसांनी रस्त्यावरच महिलेची अंत्ययात्रा थांबवली, आणि समोर आला धक्कादायक प्रकार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In