शाळेने शाळ श्रीफळ व छञपती शिवाजी महारांजांची प्रतीमा भेट देऊन मानले आभार
रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यातील डोल्हारा जिल्हा परिषद शाळेला आधारवड फाउंडेशने 1 लाख 75 हजार रुपये आर्थिक मदत केल्याने ता. 2 मार्च रोजी आधारवड फाउंडेशनचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी आधारवड फाउंडेशनने दिलेल्या 1 लाख 75 हजार रूपयाची आर्थिक मदतीमुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोल्हारा केंद्र आंबा रंग रंगोटीसह अनेक शालेय स्तरावरील विविध कामे करण्यात आली.
यावेळी शाळेच्या वतीने आधार फाऊंडेशनचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजीत करुन या कार्यक्रमात आधारवड फाउंडेशनचे अध्यक्ष शामराव बाबुराव वाढेकर यांचे वडील बाबुराव वाढेकर व आई गयाबाई बाबुराव वाढेकर तसेच सचिन चव्हाण यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी गट शिक्षण अधिकारी संतोष साबळे व केंद्र समन्वयक कल्याण बागल यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. या वेळी संतोष साबळे, केंद्र समन्वयक कल्याणराव बागलसह शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पाराजी निंबाळकर सरपंच गंगाबाई चिखले,सदस्य राजाराम गुंजाळ, प्रतिष्ठित नागरिक सतीशराव चिखले, ज्ञानेश्वर चिखले,दशरथ चिखले, अंगणवाडी ताई मंदा निंबाळकर,आदर्श शिक्षक दिलीपराव मगर अण्णा, दत्ता पाष्टे, उपाध्यक्ष रामेश्वर काटकर बाबासाहेब चिखले मकसूद भाई, केंद्रप्रमुख पतिंगराव सर शाळेचे मुख्याध्यापक अनिल मुजमुले सर , अरुण बोनगे सर, किशोर हिवाळे सर, विद्यार्थी व गावातील नागरीक मोठया प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण कुलकर्णी सर यांनी केले व आभार पतींगराव सर यांनी मानले.

