अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात आमदार समीर कुणावार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महिला मोर्चाच्या वतीने नारी शक्ती वंदन कार्यक्रमा अंतर्गत शक्ति वंदन पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा आमदार समीर कुणावार यांच्या निवास स्थान येथून प्रारंभ होऊन विठोबा चौक, सुभाषचंद्र बोस चौक, मोहता चौक ते कारंजा चौक येथे गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून समाप्त करण्यात आली.
या पदयात्रे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी केलेल्या विविध योजनांची माहिती असलेले फलक सर्व महिलांनी हातात घेऊन प्रदर्शन केले. या वेळेस भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा छाया सातपुते, अनिता मावळे महिला मोर्चा महामंत्री, नलिनी सयाम हिंगणघाट विधानसभा महिला प्रमुख, रविला आखाडे हिगंणघाट शहर महीला अध्यक्षा, कीर्ती सायंकार हिंगणघाट ग्रामीण महिला अध्यक्षा, शिला सोनारे वर्धा जिल्हा चिटणीस, कौसर अंजुम अल्पसंख्याक महाराष्ट्र सदस्य, नमीता पाठक समुद्रपुर मीडीया प़मुख, शारदा पटेल, सीतल खंदार, धनश्री वरघणे, वैशाली सुरकार, विधा पेडके, रसिका रोहणकर, धनश्री क्षिरसागर, साधना कदम, उषा लांजेवार, मंगला ठवरी, वदंना सातघरे, इंदु उईके, संगिता शेडमाके, लंका जुमनाके, सत्यभामा परचाके, रेखा सलामे, ममता आत्राम, कल्पना धुवे॔, साधना ऊईके, चित्रा मडावी, शोभा गैरवार, मनिषा देशकर आणि सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

