✒️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
अहमदनगर:- चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. ऋषी कैलास जाधव वय 21, रा. शक्तीनगर, सूतगिरणी, ता.
श्रीरामपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शिर्डी येथे खरेदी करत असताना कृष्णवेणी गंगारत्नम पालती वय 47, रा. विनायकनगर, निजामाबाद, तेलंगणा यांचे 66 हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी ओढून नेले होते. याबाबत शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी एका आरोपीला मंगळसूत्रासह अटक केली होती.
मात्र, एक आरोपी घटना घडल्यापासून फरार होता. दरम्यान, आरोपी ऋषी जाधव हा त्याच्या घरी येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कटके यांना खबर्याकडून मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या घरी जाऊन सापळा लावून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. शिर्डी पोलिस ठाण्यात आरोपीविरूद्ध चैन स्नॅचिंगचे दोन गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब फोलाणे, संदीप घोडके, पोलिस नाईक शंकर चौधरी, रवि सोनटक्के, विशाल दळवी, भीमराज खर्से, आकाश काळे, संभाजी कोतकर आदींच्या पथकाने केली.