अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- अकोला जिल्हा हिवताप कार्यालय येथे नवनियुक्त हिवताप अधिक्षक म्हणून दीपक इंगळे यांनी मंगळवार, दि. १९ रोजी पदभार स्वीकारला.
आरोग्य विभागाच्या वतीने सहायक अधिक्षक यांना अधिक्षक म्हणून पदोन्नती प्रदान केली असून आरोग्य सेवा अकोला मंडळाचे उपसंचालक यांच्या आदेशान्वये दि. १६ रोजी ग्रामीण रुग्णालय बाळापूर येथे कार्यरत असलेले वरिष्ठ लिपीक दीपक दत्तात्रय इंगळे यांना सेवा ज्येष्ठतेनुसार जिल्हा हिवताप कार्यालय येथे अधिक्षक पदी नियुक्ती देण्यात आली. म्हणून अकोला जिल्हा हिवताप कार्यालय येथे रुजु झालेले नवनियुक्त हिवताप अधिक्षक दीपक इंगळे यांचा त्यांच्या कार्यालयात व्हाईस ऑफ मिडिया आरोग्य विंगचे जिल्हा समन्वयक उमेश इंगळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी समाज क्रांती आघाडिचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बंडुदादा वानखडे, दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतिय बौध्द महासभेचे जिल्हा कार्याध्यक्ष देविलाल तायडे, सामाजिक कार्यकर्ता सतिश तेलगोटे, सुमित तेलगोटे, व व्हाईस ऑफ मिडिया आरोग्य विंगचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

