देवेंद्र शिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधि
नागपूर:- हिंगणा तालुक्यातील नागाझरी गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने सर्विकड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नागझरी गावात 14 सप्टेंबर ला रात्री राहत्या घरी शेतकऱ्याने गळफास लावून जिवनयात्र संपवली आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव संजय नारायण पुसाम वय ४५ वर्षे असे असुन त्यांना दोन लहान मुले, पत्नी, म्हातारी आई आहे त्यांच्या कडे दोन एकर कोरडवाहू शेती असुन सततच्या पावसामुळे त्यांचे पिकं खराब झाली होती त्या चिंतेत त्यांनी आत्महत्या केल्याचे परिवारातील सदस्यांनी सांगितले.
गळफास लावून आत्महत्या करणारे शेतकरी आदिवासी समाजाचे होते. त्यांची दोन एकर शेती वर्धा जिल्ह्यातील सुरगाव परिसरात आहे.शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

