प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 ला सायं.08.00 वा. पहिल्या टप्प्यात महिला गट यांच्याद्वारे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थितीत कार्यक्रमास लाभलेले अध्यक्ष भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे कार्यक्रमसह लाभलेले प्रमुख अतिथी पुलगावचे नवनियुक्त ठाणेदार मा. राहुल सोनवणे साहेब कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विकी पाखरे, मनीष शाहू, गजूभाऊ पाचारे, विनोद दुबे, नानाजी जुमाडे, अभिलाजी दरवडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजनाचे सुंदर असे नियोजन करणारे काकाजी घोडेस्वार, रुपेश टेंभुर्णे, दिलीप करवराडे, प्रशिक साखरे, शुभम भाईसारे, विपिन साखरे, अविनाश नशराडे आणि चक्रवर्ती सम्राट स्पोर्टिंग क्लबचे सर्व सदस्य गण यांच्याद्वारे नाचणगाव वार्ड क्रमांक दोन मध्ये आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे युवा पिढीने आजच्या युगामध्ये संदेश देण्यात आला. मैदानी खेळ विलुप्त होत असून लहान पासून मोठ्यापर्यंत सर्वांना मोबाईलचे खेळ आणि वेड लागले आहे याकरिता आयोजकाद्वारे मैदानी खेळ जिवंत ठेवून युवा पिढींचा उत्साह वाढवण्यात येत आहे.
आजच्या युगातील हे खेळा नाहीसे झाले मोबाईल मधील खेळापासून दूर करून योग्य कामासाठी मोबाईलचा वापर करून उर्वरित वेळात खेळाकडे लक्ष दिले पाहिजे या खेळाच्या माध्यमातून नोकरी मिळवण्याची सर्वांना संधी आहे फक्त व्यसना पासून दूर राहून मेहनत व चिकाटीने प्रशिक्षकास आपला वेळ खेळत देऊन संधीचे सोने करावे आजचे अनेक तरुणांचा कल डॉक्टर इंजिनियर होण्याकडे आहे मात्र यासाठी महागडी शिक्षण घ्यावे लागते ज्या तरुणांची आर्थिक परिस्थिती उंच शिक्षण घेण्याची नाही अशा ग्रामीण भागातील तरुणांनी मैदानी खेळाकडे लक्ष देऊन मेहनत व चिकाटीने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर खेळाच्या माध्यमातून उन्नती करावी असे मत अंकुश कोचे द्वारा कार्यक्रमाच्या माध्यमातून समस्त युवा पिढी नागरिकांना संबोधित करण्यात आले.

